नवरात्रीचे व्रत करत असाल, तर आहारात करा ‘या’ प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश

नवरात्रोत्सवाला 26 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 04 ऑक्टोबरपर्यंत साजरा होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवीची उपासना केली जाते. यावेळी नऊ दिवस उपवास केला करतात. उपवासादरम्यान, बरेच लोक फक्त एकदाच फलाहार करतात. या दिवसांत उपवास करणाऱ्या व्यक्तिने आहारात उच्च प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. दिवसभर भूक लागणार नाही, आणि पुरेशी ऊर्जाही शरीरात टिकून राहील. यामुळे चला जाणून घेऊया अशा पदार्थांविषयी. ज्यांचा नवरात्रीच्या उपवासादरम्यान समावेश केला जाऊ शकतो.

पनीर


पनीर या दुग्धजन्य पदार्थामुळे अन्नाची चव वाढते. फळांचा आहार घेताना पनीरचाही विविध प्रकारे समावेश केला जाऊ शकतो. पनीर हा प्रथिनयुक्त आहार आहे. पनीरचा समावेश आहारात केल्यास शरीरातील ऊर्जा टिकून राहायला मदत होते.

चीज

उपवासात फळांच्या आहारातही चीज वापरता येते. त्याची चवही खूप आवडते आणि त्यामुळे अनेक खाद्यपदार्थांची चव वाढते. उपवासादरम्यान आवडीनुसार आहारात चीजचा समावेश करू शकता.

दूध


दूध हे पूर्णान्न मानले जाते. ज्यांना आहारात फळे रोज खायला आवडत नाहीत किंवा ज्यांना दररोज फळे खायचा कंटाळा येतो, अशांनी फक्त दुधाचे सेवन केल्यास नऊ दिवस शरीरातील ऊर्जा टिकून राहू शकते.

दही


उपवासात दह्याचा समावेश फायदेशीर ठरतो. उपवासाच्या वेळी पचनशक्ती उत्तम राहण्यासाठी दही खावे. दह्यात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात.

शिंगाड्याचे पीठ


शिंगाड्याचे पीठ अत्यंत पौष्टिक आहे. हे पीठ पचण्यास हलके असते शिवाय यामुळे शरीराला पुरेसे पोषण मिळते. उपवासाच्या काळात या पिठापासून पुऱ्या, दशम्या, लाडू, शिरा, कढी अशा प्रकारचे पदार्थ बनवून विशेष आवडीने खाल्ले जातात.