घरात सुख-समृद्धी येण्यासाठी यंदाच्या नवरात्रीत घरी आणा ‘ही’ वस्तू, जाणून घ्या ज्योतिषांचे म्हणणे

सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाचे आनंदमय आणि भक्तिमय वातावरण सुरू आहे. यावर्षी दुर्गादेवीचे आसन हत्ती असून ती हत्तीवर स्वार होऊन आली आहे. जेव्हा दुर्गादेवी हत्तीवर बसून येते तेव्हा हा शुभ संकेत मानला जातो. त्यामुळे या दिवसांत पाऊस पडतो आणि सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. लोकांची घरे अन्नधान्याने भरलेली असतात. सर्वत्र सुखसमृद्धीचे वातावरण असते. त्यामुळे यंदाच्या नवरात्रात घरी छोटीशी हत्तीची मूर्ती घरी आणल्यास त्याचे चमत्कारिक लाभ आपल्याला मिळू शकतात, असे जोतिषांचे म्हणणे आहे. जाणून घेऊया याबाबत ज्योतिषशास्त्र काय सांगते.

पितळी हत्तीची मूर्ती 
वास्तुशास्त्रानुसार, हत्तीची छोटीशी पितळी मूर्ती घरात आणून ठेवल्यास यामुळे सकारात्मक ऊर्जेत वाढ होईल. सकारात्मक ऊर्जेचा घरात प्रवेश झाल्यामुळे घरात येणारी नकारात्मक ऊर्जा दूर होईल. या छोट्या हत्तीच्या मूर्तीमुळे घरातील नकारात्मक वातावरण दूर होईलच शिवाय कामात यशस्वी होण्याचे अनेक मार्ग तुम्हाला सापडतील. ही मूर्ती तुम्ही बैठकीच्या खोलीत ठेवू शकता.

हत्तीचे चित्र
घरातील लिव्हिंग एरियामध्ये हत्तीची प्रतिमा लावल्यास आर्थिक उत्पन्नात वाढ होते. या फोटोमधील हत्तीची सोंड वरच्या दिशेला उचललेली असली पाहिजे, एवढे प्रतिमा घरी आणताना लक्षात ठेवावे. यामुळे घरात सुख-शांती नांदते. धनप्राप्ती होते. हत्तीचे चित्र घरातील उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते.

चांदीच्या हत्तीची मूर्ती 
घरातील तिजोरीत पैसे ठेवण्याच्या जागी चांदीचा हत्ती ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे लक्ष्मीदेवीची कृपा प्राप्त होते. ती प्रसन्न राहते. त्यामुळे व्यक्तिच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते. एखाद्या व्यक्तिच्या पत्रिकेत पंचम आणि द्वितिय स्थानी राहू असेल तर अशा व्यक्तिलाही या उपायाने फायदा मिळू शकतो.

बेडरूममध्ये हत्तीची जोडी ठेवणे
वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये हत्तीची जोडी म्हणजे नर-मादीची मूर्ती ठेवल्यास दाम्पत्य जीवनात अडचणी येत नाहीत. यामुळे पती-पत्नीची भांडणे होत नाहीत. जोडीदारासोबत नाते घट्ट होण्यासाठी बेडरूममध्ये हत्तीची जोडी अवश्य ठेवा, असे जोतिषशास्त्र सांगते.

घरात कोठे हत्ती ‘या’ ठिकाणी ठेवू नका ?
हत्तीचे चित्र किंवा मूर्ती दक्षिण आणि पश्चिम दिशेला ठेवू नका. घरी किंवा दुकानात हत्तीचे चित्र लावताना हत्तीची सोंड खाल्याच्या बाजूला असलेले चित्र लावू नका. प्लास्टिक किंवा प्लास्टरपासून तयार केलेला हत्ती चुकूनही घरी ठेवू नका. जर तुम्ही हत्तीची नर-मादी जोडी घरी ठेवली आहे तर त्यांचे तोंड एकमेकांसमोर येईल अशा पद्धतीने ते ठेवा. त्यांची पाठ समोरासमोर येईल, अशा पद्धतीने त्यांना उभे करू नका.