निसर्गाचा रुद्रावतार, वीज कोसळून पाच महिला ठार

226
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । नांदेड

पेरणीपूर्व मशागतीचे कामे करण्यासाठी शेतामध्ये गेलेल्या महिलांच्या अंगावर वीज कोसळून पाच महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उमरी तालुक्यातील कारला परिसरात घडली. रेखा मारोती पवळे, शोभा संभाजी पवळे, शोभा देविदास जाधव, मोहनाबाई गंगाधर सोनवने आणि शेषाबाई माधव गंगावने अशी मृत महिलांची नावे आहेत

उमरी तालुक्यातील कारला येथील आस्वल दरीचा माळ परिसरात पेरणीपूर्वीचे कामे करण्यासाठी शेतामध्ये गेल्या होत्या. दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. चारच्या सुमारास विजांच्या कडकटासह पावसाला सुरुवात झाली. शेतामध्ये काम करणार्‍या पाच महिलांनी झाडाखाली असरा घेतला. मात्र झाडावर वीज कोसळल्याने पाचही महिलांचा जागीच मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या