गली बॉय…सोशल मीडियावर हिट होतोय पार्ल्यातला लील्लीबॉय…

1686

‘रॅप’चा उगम आफ्रिकेतील संस्कृतींंमधून झाला आहे.  मुळात ‘रॅप’ म्हणजे हजारो वर्षांपूर्वी आफ्रिकेत कथा कथन करण्याची एक पारंपरिक पद्धत होती. कालांतराने या कथन पद्धतीला ‘रॅप’ असे संबोधले जाऊ लागले. आणि आज तर या ‘रॅप’ने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. इतकेच नव्हेतर हिंदुस्तान मधील मुंबईसारख्या शहरांमध्ये अनेक ‘रॅप’ स्टार पाहायला मिळातात. इतकेच नव्हे एका ‘रॅपर’च्या जीवनावर आधारित ‘गली बॉय’ नावचा चित्रपट देखील प्रदर्शित होऊन गेला आहे. या चित्रपटाने चांगली कमाई तर केलीच शिवाय हिंदुस्थानकडून ‘ऑस्कर’साठी देखील हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. हे सगळं इथे मांडण्याचा उद्देश हाच की अशाच प्रकारचा एक रॅपर ‘लील्लीबॉय’ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे हा रॅपर मुंबईकर आहे. त्याच्याशी संवाद साधला आमचा प्रतिनिधी आकाश शिंदे याने

बातचीत केली, तेव्हा त्याची जिद्द, मेहनत समोर आली.

‘लील्लीबॉय’ सध्या सोशल मीडियावर गाजतो आहे. त्याच्या नावातच गंमत आहे. पण त्याचं खरं नाव तुषार रावसाहेब साळवी असं आहे. तुषार हा एका सर्वसाधारण कुटुंबातील मुलगा आहे. तसेच त्याला लहानपणापासूनच रॅप गाण्याची आवड होती. तुषारने सर्व प्रथम 2017 साली सोशल मीडियाच्या माध्यमातून एक सोलो ट्रॅक गायले आणि प्रेक्षकांनी या सोलो ट्रॅकला खूप चांगला प्रतिसाद दिला होता. हा प्रतिसाद पाहून तुषारनं आपल्या काही मित्रांच्या मदतीनं एक छोटं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आणि ‘लील्लीबॉय’ नाव धारण करत एक युट्यूब चॅनेलची सुरूवात केली.

लील्लीबॉय होण्याचे मुळ कारण म्हणजे तुषार हा लिलवेन या रॅपरला आपले गुरू मानतो. तसेच  लिलवेन हा अमेरिकेतील सुप्रसिद्ध रॅपर आहे. लिलवेन त्याच्या रॅपने जगाला वेड लावले आहे. आणि लिलवेनच्या चाहत्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणत आहे. यातलाच एक तुषार देखील आहे. तुषार जरी लिलवेनला आपला गुरू मानत असला तरी आजपर्यंत तो एकदा ही त्याला भेटू शकलेला नाही. लिलवेनची स्टाईल आहे तीच स्टाईल तुषार फॉलो करतो. उदाहरणार्थ लिलवेन सारखे केस, चालणे, रॅप बोलणे त्याच्याच पद्धतीने करतो. तुषारचे राहणीमान हूबेहूब लिलवेन प्रमाणे असल्या कारणाने तुषारचे सर्व मित्र त्याला लील्लीबॉय म्हणायचे आणि आज तीच तुषारची एक नवीन ओळख झालीआहे.

तुषारने आपली आवड जोपासली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांन पर्यंत पोचवण्यास सुरुवात केली. तुषारने आपले रॅप लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हा पर्याय निवडण्याचे मुळ कारण म्हणजे पैसा कमवण्याचे साधन यामधून तयार होईल असा त्याचा विचार होता. कालांतराने तुषारच्या व्हिडीओला प्रसिद्धी मिळतच गेली आणि आता तो रॅपचे काही शो देखील करतो. तुषारने त्याची आवड जोपासली आणि आज त्याची आवडच त्याची ओळख आणि उदारनिर्वाहाचे साधन बनले आहे. तसंच तुषारला त्याच्या रॅपसाठी ‘पीपल चॉईस’ नावाचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

तुषारच्या राहणीमानचे ज्या प्रकार कौतुक केले जाते त्याच प्रकारे त्याच्यावर टीका देखील होते. त्याच्या अशा वेगळ्या स्टाईलने राहण्यामुळे काहीजण त्याला अंमलीपदार्थाचे सेवन करणारा तरुण समजतात. मात्र तुषार स्पष्ट सांगतो की, तो अंमलीपदार्थाचे सेवन करत नाही. अंमली पदार्थांचे सेवन करून आपण आपले भविष्य धोक्यात घालत असतो असं त्याचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या