आपत्कालीन परिस्थितीत लोकांना सावध करणार ‘भोंगा’

70

सामना ऑनलाईन । मुंबई

आपत्कालीन परिस्थितीत लोकांना सावध करण्यासाठी ओळखीची गरज नसते. ‘भोंगा’ घेऊन हे काम आता एका टचवर करता येईल. हा भोंगा एकाच वेळी शेकडो लोकांना केवळ संकटापासून सावध करणार नाही तर महत्त्वाची माहितीही देईल. हा भोंगा म्हणजे नावाप्रमाणे काही लाऊडस्पीकर वगैरे नाही तर एक मोबाईल ऑप्लिकेशन आहे.

कुटुंब आणि मित्रांच्याही पलीकडील जगाशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी हा भोंगा ऍप लिंक्स इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेडने बनवला आहे. हा ऍप मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यास आपल्या एक किलोमीटर परिसरातील हाच ऍप असलेल्या लोकांशी आपण क्षणार्धात कनेक्ट होतो. या ऍपवर व्हॉटस्ऍपप्रमाणेच मेसेज पाठवता येऊ शकतात. ट्रफिक जॅम, कुणी व्यक्ती हरवली असेल, एखाद्याचे काही हरवलेले सामान सापडले असेल, एखादे ठिकाण शोधायचे असेल, काही माहिती मिळवायची असेल, एखादी वस्तू विकायची असेल किंवा खरेदी करायची असेल तर हा ‘भोंगा’ आपल्याला मदत करू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या