आधार १ जानेवारीपासून ओटीपीने लिंक करता येणार

61

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करण्यासाठी १ जानेवारीपासून ओटीपी अर्थात वन टाइम पासवर्ड हा पर्याय उपलब्ध होणार आहे.

मुदतवाढ मिळाल्यामुळे मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०१८ पर्यंत वेळ उपलब्ध आहे. ज्यांनी अद्याप मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक केलेला नाही त्यांच्यासाठी ‘ओटीपी’ आधारित ‘व्हॉइस गाइडेड’ यंत्रणा मदतीला धावून येणार आहे.

या प्रक्रियेत मोबाईलधारकाला इंटरॅक्टीव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीमला कॉल करावयाचा आहे. त्यानंतर हिंदी, इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषेचा पर्याय निवडून, माहिती घेऊन ओटीपी जनरेट करता येईल. ओटीपी व्हेरिफाइड झाला की मोबाईल क्रमांक आधारशी जोडला जाईल. ज्या ग्राहकांनी मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक केलेला नाही अशा मंडळींना लवकरच सर्व्हिस प्रोव्हायडर टेलिकॉम कंपन्या ओटीपी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणारे मेसेज (एसएमएस) पाठवणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या