फोटो स्टोरी : फुटबॉल स्टार मेस्सी झाला ३१ वर्षाचा

70

सामना ऑनलाईन । मुंबई

क्रिकेटचं नाव घेतली की आपल्याला आठवतो ब्रॅडमॅन, रिचर्डसन, स्टीव्ह वॉ, सचिन तेंडुलकर तसंच फुटबॉल म्हटलं की आपल्यासमोर येतो तो पेले, मॅराडोना, झिनेदान झिदान, रोनाल्डो, ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी. हाच मेस्सी रविवारी ३१ वर्षांचा झाला. सध्याच्या घडीला लिओनेल मेस्सीचे नाव स्टार खेळाडूंमध्ये घेतले जाते. रशियात सुरू असलेल्या विश्वचषकामध्ये त्याने आपल्या पायाची जादू अद्याप दाखवली नसली तरी देशाकडून आणि फुटबॉल क्लबकडून खेळताना त्याच्या नावावर अनेक विक्रम जमा आहेत.

messi-123

१) मेस्सी हा बार्सिलोना फुटबॉल क्लबचे प्रतिनिधित्व करतो. गेल्या अनेक वर्षापासून तो या क्लबसोबत जोडला गेलेला आहे. बार्सिलोनाकडून सर्वात तरुण खेळाडू म्हणून खेळण्याचा विक्रम मेस्सीच्या नावावर आहे. मेस्सीने वयाच्या १७ व्या वर्षी बार्सिलोनासाठी पहिला सामना खेळला होता. या क्लबसाठी त्याने आतापर्यंत ५८२ गोल केले आहेत.

messi-barsilona-01

२) मेस्सीच्या नावावर अनेक विक्रम जमा आहेत. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. मेस्सीने सलग ९ वर्ष प्रत्येक सिजनमध्ये ४० पेक्षा जास्त गोल झळकावण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.

messi-goal

३) बार्सिलोनाकडून सर्वात कमी वयात सामना खेळण्याच्या विक्रमासह मेस्सीच्या नावावर आणखी एक अनोखा विक्रम आहे. सर्वात कमी वयाने मेस्सीने १०० हून अधीक चॅम्पियन लिग्जचे सामने खेळण्याचा मान मिळवला आहे. बार्सिलोनाकडून खेळताना मेस्सीने सर्वाधिक ४१ हॅटट्रिक केल्या आहेत.

messi-argentina

४) बार्सिलोना या क्लबकडून खेळताना मेस्सीने आपल्या एकट्याच्या बळावर अनेक सामने जिंकून दिले आहेत. मेस्सीला सर्वाधिक ५ वेळा गोल्डन शूज हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच फिफाच्या गोल्डन बॉल या पुरस्कारानेही त्याला ५ वेळा गौरवण्यात आले आहे.

messi-in-fifa

५) मेस्सीने अर्जेंटिनासाठीही दमदार कामगिरी केली आहे. मेस्सीच्या नावावर ४ विश्वचषक खेळण्याची नोंद असून त्याच्याच नेतृत्वाखाली २०१४ मध्ये झालेल्या विश्वचषकात अर्जेंटिनाचा संघ फायनलमध्ये पोहोचला होता. परंतु फायनलमध्ये जर्मनीकडून पराभव झाल्याने अर्जेंटिनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

आपली प्रतिक्रिया द्या