लिपस्टिक अंडर माय बुरखाचा मार्ग मोकळा

15

सामना प्रतिनिधी । मुंबई

अश्लील संवाद आणि बोल्ड दृश्यांचे कारण देत यामुळे सहा महिन्यांहून अधिक काळ सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकलेल्या लिपस्टिक अंडर माय बुरखा या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

ट्रेड एनालिस्ट तरन आदर्श यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली असून २८ जुलैला हा चित्रपट हिंदुस्थानात रिलीज होणार आहे. कोंकणा सेन, रतन पाठक-शाह यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका असून विविध महोत्सवांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. परंतु सेन्सॉरने प्रमाणपत्र देण्यास मनाई केल्याने कलाकार विरुद्ध सेन्सॉर बोर्ड हा वाद चांगलाच रंगला होता. चित्रपटाच्या प्रदर्शनावर आनंद व्यक्त करताना दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तव म्हणाल्या की, सेन्सॉरसोबतच्या सहा महिन्यांच्या लढाईनंतर अखेर आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्या महिलांसाठी आम्ही हा चित्रपट बनवलाय त्या सर्व महिलावर्गाचा हा विजय आहे.

आपली प्रतिक्रिया द्या