यूपीमध्ये दारूची दुकानं उघडली; बाटल्या घेण्यासाठी प्रचंड गर्दी, पोलिसांनाही केलं अॅलर्ट

wine-shop-up

यूपीमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. वाढते संक्रमण लक्षात घेता राज्य सरकारने वाराणसी जिल्ह्यातील कोरोना कर्फ्यू वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता 17 मे पर्यंत कोरोना कर्फ्यू सुरू राहणार आहे. तर या दरम्यानच्या काळात दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे. दारूची दुकानं बंद केल्यानं 100 कोटीहून अधिक रुपयांचं नुकसान होत असल्याचं असोशिएशननं पत्राद्वारे कळवलं होतं. दारूची दुकानं उघडा अशी मागणी जोर धरू लागली होती अखेर हा निर्णय घेण्यात आला.

यूपीमध्ये दारूची दुकानं पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर सोमवारी दुकानं उघडली तर लोकांची तुफान गर्दी दारूच्या दुकानांबाहेर पाहायला मिळाली. गाझियाबादमध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत दारूची दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. असं असताना देखील सकाळपासूनच गर्दी आणि रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

प्रशासनाने सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आदेश दिले असले तरी देखील अपवादानेच एखाद्या ठिकाणी तसं चित्र पाहायला मिळत होतं. अन्य सर्व ठिकाणी प्रचंड गर्दी पाहायला मिळत असल्याचं हिंदी वृत्तसंकेतस्थळांनी म्हटलं आहे.

कानपूरमध्ये दारूची दुकानं उघडली आणि लोकं अक्षरश: तुटून पडले अशी अवस्था होती. दुकानं उघडण्याआधीच रांगा लागल्या होत्या. दुकानं उघडल्यावर एकेका व्यक्तीनं जवळपास डझनभर बाटल्या खरेदी करून नेल्या.

वाराणसीसह सर्वच भागात कर्फ्यू असताना देखील दारूची दुकानं सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाराणसीत मात्र सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत दारूची दुकानं सुरू ठेवण्यात येतील असं स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. दारूच्या दुकानांवर कोणताही वादविवाद होऊ नये याकरिता पोलीस ठाण्यांना अॅलर्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, असोसिएशचे अधिकारी कन्हैयालाल मौर्य यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून आधीच कळवलं होतं की दरदोज 100 कोटीहून अधिक रुपयांचं नुसकान झेलावं लागत आहे. त्यामुळे दारूच्या दुकानांना परवानगी मिळणं आवश्यक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या