अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने सोशल मीडियावर एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सर्वाधिक फॉलो केलेल्या हिंदुस्थानीयांच्या यादीत श्रद्धा कपूरने मोदींना मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे एकूण 91.5 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या 91.3 मिलियन आहे. सर्वात जास्त फॉलोअर्स हिंदुस्थानी क्रिकेटपटू विराट कोहली असून 270 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर अभिनेत्री प्रियंका चोप्रा आहे. तिला 91.8 मिलियन युजर्संनी फॉलो केले आहे, तर पाचव्या नंबरवर आलिया भट्ट असून तिला 85.2 मिलियन इन्स्टाग्रामवर फॉलो केले आहे.