
आयपीएल 2020 चा हंगाम 19 सप्टेंबर पासून यूएईमध्ये सुरू होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. मात्र तत्पूर्वी 2008 ते 2019 दरम्यान काय घडले याचा थोडक्यात आढावा घेऊया. कोणत्या खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या, कोणत्या खेळाडूने सर्वाधिक विकेट्स घेतल्या, षटकार ठोकले या प्रश्नांची उत्तरे झटपट पाहूया.
1. कोणत्या संघाने सर्वाधिक वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली?
– मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सर्वाधिक 4 आयपीएल कप जिंकला आहे. 2013, 2015, 2017 आणि 2019 ची स्पर्धा मुंबईने जिंकली.
2. 2008 ते 2019दरम्यान कोणता संघ सर्वाधिक लढती जिंकला?
– मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सर्वाधिक 107 लढती जिंकल्या आहेत.
3. सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर आहेत?
– रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली टॉप स्कोरर असून त्याच्या नावावर 5,412 धावांची नोंद आहे.
IPL 2020 – मुंबई इंडियन्सपुढे जेतेपद राखण्याचे आव्हान, ‘ही’ आहे मुख्य अडचण
4. सर्वाधिक विकेट्स कोणत्या गोलंदाजाने घेतल्या?
– मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज लसीथ मलिंगा याने सर्वाधिक 170 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र खासगी कारणाने त्याने यंदा आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
5. सर्वाधिक षटकार कोणाच्या नावावर आहेत?
– वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेल याने आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक 326 षटकार ठोकले आहे.
6. आयपीएलमधील यशस्वी कर्णधार कोण?
– रोहित शर्मा सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने 4 वेळा विजेतेपद पटकावले आहे.
7. आयपीएलमधील चौकरांचा बादशहा कोण?
– डावखुरा शिखर धवन याच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकरांची नोंद असून त्याने 524 वेळा चेंडू सीमापार टोलवला आहे.
8. सर्वाधिक वेळा रनर-अप राहिलेला संघ कोणता?
– तीन वेळा विजेतेपद जिंकलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ सर्वाधिक 5 वेळा रनर-अप (उपविजेता) राहिला आहे.
9. सर्वाधिक वेळा ऑरेंज कॅप जिंकणारा खेळाडू कोण?
– ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने 2015, 2017 आणि 2019 ला सर्वाधिक धावा काढत ऑरेंज कॅप जिंकली.
10. एका हंगामातील सर्वाधिक धावांचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
– विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर हा विक्रम आहे. 2016 ला कोहलीने 4 शतक आणि 7 अर्धशकत यांच्या जोरावर 973 धावा चोपल्या होत्या.
IPL 2020 – आरसीबी समोर विजेतेपदाचे ‘विराट’ चॅलेंज, असा आहे बंगळुरूचा संघ