फोटो स्टोरी : ‘वन डे’मध्ये द्विशतक ठोकणारे ६ दिग्गज

121

सामना ऑनलाईन । मुंबई

एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ८ द्विशतकं झळकावली गेली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारे जगात फक्त सहा खेळाडू आहेत आणि अभिमानाची बाब म्हणजे यात तीन हिंदुस्थानी खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे हिंदुस्थानच्या रोहित शर्माने तीन वेळा द्विशतक झळकावण्याची कामगिरी केली आहे. चला तर पाहूया कोणत्या खेळाडूने कधी द्विशतक झळकावले आहे.

१. सचिन तेंडुलकर (हिंदुस्थान) –

sachin-tendu

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिले द्विशतक क्रिकेटचा देव सचिनने २४ फेब्रुवारी २०१०ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ठोकले होते. ग्वाल्हेरमध्ये झालेल्या या सामन्यात सचिनने नाबाद २०० धावा केल्या होत्या.

२. विरेंद्र सेहवाग (हिंदुस्थान) –

viruseh

सचिनपाठोपाठ हिंदुस्थानचा माजी सलामीवीर सेहवागने ८ डिसेंबर २०११ला वेस्ट इंडिजविरुद्ध इंदूरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात २१९ धावा केल्या होत्या.

३. रोहित शर्मा (हिंदुस्थान) –

rohit-sharma-hun

सचिन आणि सेहवागनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा रोहित हा तिसरा हिंदुस्थानी खेळाडू आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ नोव्हेंबर २०१३ला बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या सामन्यात २०९ धावांची खेळी केली होती.

४. रोहित शर्मा (हिंदुस्थान) –

rohit-and-shikhar

कोलकाताच्या प्रसिद्ध ईडन गार्डन्सच्या मैदानावर १३ नोव्हेंबर २०१४ला पुन्हा एकदा हिटमॅन रोहितचे वादळ घोंगावले होते. लंकेविरुद्धच्या या सामन्यात रोहितने २६४ धावांची तुफानी खेळी केली होती.

५. ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) –

gyalaa

वेस्ट इंडिजचा तडाखेबाज खेळाडू ख्रिस गेलने २४ फेब्रुवारी २०१५ला एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले. गेलने झिम्बाब्वेविरुद्ध कॅनबेरामध्ये झालेल्या सामन्यात २१५ धावा ठोकल्या होत्या.

६. मार्टिन गुप्टील (न्यूझीलंड ) –

martin-guptill

एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा गुप्टील न्यूझीलंडचा पहिला खेळाडू आहे. २२ मार्च २०१५ला वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात गुप्टीलने नाबाद २३७ धावा ठोकत रोहित शर्मानंतर सर्वोच्च धावांची नोंद केली.

७. रोहित शर्मा (हिंदुस्थान) –

rohit-rr

मोहालीमध्ये रोहितने एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरे द्विशतक झळकावले. या सामन्यात रोहितने नाबाद २०८ धावांची खेळी केली.

८. फखर जमान – (पाकिस्तान)

fakhar-jaman

पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमान याने २० जुलै, २०१८ ला झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यात नाबाद २१० धावा फटकावल्या.

आपली प्रतिक्रिया द्या