काम करण्यापूर्वी संगीत ऐका..

30
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

रोज ऑफिसमध्ये जाऊन काम करणं ही खरंतर दैनंदिन गोष्ट. पण, अनेकदा त्याच सवयीच्या गोष्टींचा कंटाळा येतो. आजकालच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या आयुष्यात ऑफिसचं कामही कधीकधी त्रासदायक ठरतं. अशावेळी काहीतरी रिफ्रेशिंग हवं, असं सारखं वाटत राहतं. पण, विदेशातल्या एका वैद्यकीय अहवालाने या समस्येवर उपाय शोधला आहे. या अहवालानुसार काम सुरू करण्याआधी जर कर्मचाऱ्याने थोडावेळ संगीत ऐकलं तर त्याचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.

या अहवालावर काम करणाऱ्या टीमने काही कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांवर हा प्रयोग करून पाहिला. रोज सकाळी काम सुरू करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना त्यांचं आवडतं संगीत ऐकण्याची मुभा दिली. विशेष म्हणजे, ज्या कर्मचाऱ्यांनी संगीत ऐकून कामाला सुरुवात केली होती, त्या कर्मचाऱ्यांच्या कामात प्रगती दिसून आली. या कर्मचाऱ्यांमध्ये कामाची जलद पूर्तता, नवीन कल्पना, चांगला मूड असे बदल दिसून आले.

त्यामुळे या अहवालाने अनेक व्यावसायिक क्षेत्रांमध्ये, विशेषतः कामाचा ताण असणाऱ्या क्षेत्रांमध्ये संगीताचा वापर सुचवला आहे. तसंच कर्मचाऱ्यांच्या निवडीचा कल लक्षात घेऊन त्यांना कामापूर्वी काही वेळ संगीत ऐकण्याची मुभा देण्यासही या अहवालात सुचवण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या