लिटिल चॅम्प्सना मिळणार छोटय़ा वादकांची साथ

सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. मागील पर्वातील पंचरत्न म्हणजेच रोहित राऊत, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड आणि प्रथमेश लघाटे हे या पर्वात ज्युरीच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमातील 14 लिटिल चॅम्प्स या स्पर्धेत प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहेत.

या कार्यक्रमाचं वैशिष्टय़ म्हणजे यात एलिमिनेशन होणार नाही. तसेच फक्त गाणारेच लिटिल चॅम्प्स नाही तर वादक मित्रांमध्येदेखील चार छोटे दोस्त प्रेक्षकांच्या भेटीस येतील. अकरा वर्षांचा जय गांगुर्डे कोंगो तुंबा वाजवताना दिसेल. तो वयाच्या दोन वर्षांपासून हे वाद्य वाजवतोय. तन्वी  पाटील ही वयाच्या 8 वर्षांपासून वारणा बालवाद्य वृंदमध्ये आहे. ती लिटिल चॅम्प्सच्या गाण्यांमध्ये मेंडोलीन वाजवून साथ देईल. सोहम जगताप हा प्रेक्षकांना संतूर वाजवताना दिसेल. तर सोहम उगले हा संबळ वाजवताना दिसेल. आपण क्वचित पाहिलेली वाद्यदेखील ही मुलं अगदी सहज वाजवतात. सारेगमप लिटिल चॅम्प्स 24 जूनपासून गुरुवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता पाहता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या