#Ayodhya Live – सुनावणी पूर्ण, सुप्रीम कोर्टाने निर्णय राखीव ठेवला

9084
supreme-court-of-india

अयोध्या प्रकरणातील अंतिम सुनावणीला पूर्ण झाली आहे. सर्व पक्षकारांना बुधवारी शेवटचा युक्तिवाद करायची संधी मिळली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे 6 ऑगस्टपासून अयोध्या प्रकरणी नियमित सुनावणी सुरू आहे. त्यामुळे याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अयोध्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणीचे सर्व अपडेट

   • 23 दिवसांनंतर अयोध्याप्रकरणी निर्णय येणार
   • 40 दिवसांच्या सुनावणीनंतर निर्णय सुरक्षित ठेवला
   • अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण

  • लंच ब्रेकनंतर पुन्हा एकदा सुनावणी होणार
  • सुनावणी दरम्यान लंच ब्रेक
  • सून्नी वक्फ बोर्डाकडून जमिनीवरील हक्क सोडण्याची तयारी
  • मुस्लीम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी नकाशा फाडण्याचा प्रयत्न केला

 • हिंदू महासभेने रामजन्मभूमीसंदर्भातील एक नकाशा न्यायालयात सादर केला
 • इंग्रजांनी तिथे राम चौथऱ्यावर रेलिंग्ज बसवले होते
 • मस्जिद उभी केल्यानंतर बाहेर पूजा केली जात होती
 • मुघलांनी जबरदस्ती मंदिर तोडले
 • 1855 पर्यंत अयोध्येत पूजा होत होती, हिंदू आणि मुस्लीम पूजा करत होते
 • सीएस वैद्यनाथ यांनी युक्तिवाद सुरू केला
 • केस मागे घेण्यासाठी कुणी विनंती केलेली नाही
 • निश्चित करण्यात आलेल्या पक्षकारांशिवाय अन्य कुणाला परवानगी नाही
 • आज संध्याकाळी 5 वाजता सुनावणी पूर्ण होणार
 • खटल्यासाठी आणखी वेळ देऊ शकत नाही, आता पूरे झाले – सरन्यायाधीश
 • सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात

 • देशातील संवेदनशील भागावर पोलिसांचे लक्ष्य
 • अयोध्येत पोलिसांच्या अधिक तुकड्या तैनात
 • आजच्या अंतिम सुनावणीकडे साऱ्या देशाचे लक्ष
 • सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे 6 ऑगस्टपासून अयोध्या प्रकरणी नियमित सुनावणी सुरू
 • हिंदू आणि मुस्लिम पक्षकार एकमेकांना प्रश्नोत्तरे करतील
 • अयोध्या प्रकरणातील अंतिम सुनावणी बुधवारी म्हणजेच आज होणार
आपली प्रतिक्रिया द्या