Live- मुंबई-पुण्यात गणेश विसर्जनाची धूम

1830
फोटो - सचिन वैद्य
 • गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाचे विहंगम दृश्य

girgaon

 • कल्याण ते बदलापूरदरम्यान मुसळधार पाऊस, विसर्जनासाठी नागरिकांची गडबड

रत्नागिरी – गणपती विसर्जनादरम्यान राजापूरात तीन तरूण बुडाले

 • पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन

Photo : गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!

 • सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सीसीटीव्ही कॅमेरा ची नजर या मिरवणुकीवर राहणार आहे

गणरायाच्या निरोपासाठी गिरगाव चौपाटीवर अलोट गर्दी

 • माळीवाडाचा मानाच्या विशाल गणपतीसह अकरा मानाचे गणपती तसेच अन्य मंडळांचे गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत.
 • nagar-rangoli-visarjan
 • नगर गणेश विसर्जन मिरवणुकीत संपूर्ण मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत.
 • नगर येथे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे.
 • मुंबई-पुण्यात गणेश विसर्जनाची धूम सुरू आहे.
 • पुण्यातील अलका चौकात गणेशभक्तांच्या अंगावर साऊंड बॉक्स कोसळला.
 • लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत भक्तांची गर्दी
 • पुणे- तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूकही लक्ष्मी रोडवर सुरू
 • पुणे- तुळशीबाग गणपतीची मिरवणूक लक्ष्मी रोडवर पोहोचली
 • गुलाल-फुलांच्या वर्षावात बाप्पा आपल्या गावी निघाले..
 • नाशिकमध्येही गणेश विसर्जनाला सुरुवात
 • मुंबई- पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे.
 • पुण्यातले पाचही मानाचे गणपती विसर्जनासाठी निघाले आहेत.
 • गिरगावचा राजाही विसर्जनासाठी मार्गस्थ
 • मुंबईतील लालबाग परिसरातले तेजुकाया, गणेश गल्ली आणि लालबागचा राजा हे तिन्ही गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत.
 • मुंबईसह पुण्यातही बाप्पांच्या विसर्जनाची धूम पाहायला मिळत आहे.
 • बाप्पांच्या विसर्जनासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे.
 • आज अनंत चतुर्दशी. दहा दिवस पाहुणचाराला आलेले गणपती बाप्पा आज आपल्या गावी जाणार.
आपली प्रतिक्रिया द्या