देशवासियांनी गरजूंना पुढे येऊन मदत करावी, पंतप्रधानांचे आवाहन 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्या संवादातील काही ठळक मुद्दे –

 • आजची परिस्थिती बदलावी म्हणून देश कोणतीही कसर सोडणार नाही.
 • जेव्हा गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा, कोरोनाला प्रतिबंध करणारे नियम पाळा.
 • कोरोनाला घालवण्यासाठी देखील या शिकवणीचं पालन करण्याची नितांत गरज आहे.
 • शिस्त, धैर्य आणि आत्मसंयमाची शिकवण आपल्याला रमजानमधून मिळते.
 • रमजानचा आज सातवा दिवस आहे.
 • दवाई भी कडाई भी हा नियम महत्त्वाचा आहे.
 • कोरोनाला रोखण्यासाठी नियम कटाक्षाने पाळा, पंतप्रधानांचे आवाहन
 • मी राज्यांना आवाहन करेन की लॉकडाऊनकडे शेवटचा पर्याय म्हणून पाहावे.
 • आज आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून थांबवायचं आहे.
 • माध्यमांनी लोकांना जागृत करावं आणि लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी मदत करावी.
 • बालमित्रांनो घरात असं वातावरण तयार करा की विनाकारण लोकांनी घरातून बाहेर पडू नये
 • गेल्या वेळी माझ्या बालमित्रांनी स्वच्छतेचा संदेश दिला होता.
 • युवांनी पुढे येऊन आपल्या रहिवासी प्रदेशात शिस्तीचं पालन करण्यासाठी पुढाकार घ्यावा
 • देशवासियांनी गरजूंना पुढे येऊन मदत करा
 • आज जे लोक कोरोनाशी लढा देत आहेत, त्यांना माझं नमन
 • लोकांच्या सहभागातून ही लढाई जिंकणार आहोत.
 • शिस्त आणि धैर्याने आपला देश या ठिकाणी पोहोचला आहे.
 • देशाने ज्या धैर्याने ही लढाई लढली त्याचं श्रेय देशवासियांना
 • आज डॉक्टर्स अनेक जीव वाचवू शकत आहेत. तसंच साधनसामुग्रीही आहे
 • पण, खूप कमी वेळात आपण या सोयीसुविधांमध्ये वाढ केली.
 • आधीच्या वेळी आपल्याकडे कोरोनाशी लढण्याची साधनं नव्हती.
 • राज्यांनी मजूरांना तिथेच थांबण्याचं आवाहन करावं. जेणेकरून लसीकरण आणि रोजगार सुरू राहील.
 • राज्य आणि केंद्र सरकारामुळे श्रमिक वर्गाला ही लसीकरण होणार आहे.
 • आपल्या सर्वांचे प्रयत्न सर्वांचा जीव वाचवणं आहेच पण, अर्थचक्र प्रभावित न होणं हेही आपलं ध्येय आहे.
 • त्याचा फायदा गरीब आणि निम्न मध्यमवर्गीयांना होईल
 • आधीप्रमाणेच सरकारी रुग्णालयात मोफत लस मिळेल.
 • या दरम्यान केंद्र सरकारचे लसींसाठीचे इतर उपक्रमही तितक्याच वेगाने सुरू राहतील.
 • हिंदुस्थानात बनणाऱ्या लसींचा निम्मा हिस्सा राज्य आणि रुग्णालयांनाही मिळेल
 • तसंच 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण सुरू होणार आहे.
 • कोविड योद्धे, वैद्यकीय कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक यांना लसीकरण झालं आहे.
 • आधी 10, नंतर 11 आणि आता 12 कोटी लस दिल्या गेल्या आहेत.
 • लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात वेगासह अधिक क्षेत्रांकडे आणि गरजूंना लस मिळावी, यासाठी प्रयत्न
 • त्यामुळेच दोन स्वदेशी लसींसह जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम हिंदुस्थानात सुरू झाली.
 • उत्पादनाचा वेग आणि सहयोगी गोष्टींचा पुरवठा सोबत ठेवला गेला.
 • या निर्मितीत खासगी क्षेत्राने नाविन्य आणि उत्पादन क्षमतेचं अभूतपूर्व दर्शन घडवलं
 • आज जगातली सर्वात स्वस्त कोविड लस हिंदुस्थानात आहे.
 • आपल्या शास्त्रज्ञांनी दिवसरात्र एक करून देशासाठी लस तयार केली.
 • गेल्या वर्षी कोरोनाचे रुग्ण सापडल्यापासूनच कोविड लसीच्या निर्मितीला सुरुवात झाली होती.
 • मागणीनुसार मोठी कोविड सेंटर उभारण्यात येत आहेत.
 • रुग्णालयात बेड वाढवण्यात येत आहेत.
 • आपल्या देशाकडे फार्मसी हे मजबूत आणि मोठं क्षेत्र आहे.
 • या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि आवश्यक त्यांची मदत घेतली जात आहे.
 • फार्मसी क्षेत्रांनेही औषध उत्पादन वाढवलं आहे.
 • प्रत्येक गरजूला ऑक्सिजन मिळावा म्हणून हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहे.
 • ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठ्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर काम केल जात आहे
 • केंद्र आणि खासगी क्षेत्र या ठिकाणी काम करत आहे.
 • संपूर्ण संवेदनशीलतेने काम केलं जात आहे.
 • गेल्या काही काळात ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे.
 • गेल्या काही काळात जे निर्णय घेण्यात आले, ते देशाची परिस्थिती बदलतील
 • कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेतल्याने तुम्ही विजय मिळवू शकता. स
 • कठीण प्रसंगातही धैर्य गमावता नये.
 • यावेळीही तुम्ही त्याच कर्तव्यावर रुजू आहात.
 • तुम्ही पहिल्या लाटेतही आपलं जीवन पणाला लावून सर्वांना वाचवलं आहे.
 • या देशातील सर्व वैद्यकीय कर्मचारी, सफाई, सुरक्षा, पोलीस आणि ड्रायव्हर्स यांचं विशेष कौतुक
 • हे आव्हान मोठं आहे पण आपण आपल्या तयारीने आणि धैर्याने त्याला सामोरं गेलं पाहिजे.
 • ज्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्ती गमावल्या आहेत, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.
 • या कोरोनामुळे तुम्ही ज्या त्रासातून जात आहात त्याची मला पूर्ण कल्पना आहे.
 • कोरोनाची दुसरी लाट वादळ बनून आली आहे.
 • हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करत आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या