बोफोर्स घोटाळा होता, राफेल नाही, संरक्षण मंत्री सीतारमण यांचे काँग्रेसला सणसणीत उत्तर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

 • बफोर्समुळे ते सत्तेतून बाहेर पडले, राफेलमुळे आम्ही पुन्हा सत्तेत येऊ
 • बफोर्स घोटाळा होता, राफेल नाही
 • तुम्ही केलेल आरोप सिद्ध करून दाखवा, असं आव्हान आहे त्यांना
 • आमच्यावर घोटाळ्याचे आरोप नसल्यानेच काँग्रेसने पंतप्रधान आणि आमच्या सरकारविरोधात असे आरोप केले
 • मी सर्व प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे दिली आहेत
 • आम्ही देशाचे नुकसान केलेले नाही, योग्य तिच किंमत आम्ही कोट केली आहे
 • न्यायालयाने आदेशात म्हटलंय की देशहित लक्षात घेता विमानांच्या किंमती जाहीर न करणं योग्य ठरेल, ज्या किंमती जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्या ‘बेसिक’ विमानांच्या किंमती आहेत
 • राफेलसाठी 74 बैठका झाल्या, दर निश्चितीसाठीच्या समितीमध्ये हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होते
 • मी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत आहे, पण ते गोंधळ घालत आहे कारण त्यांना सत्य बाहेर येऊ द्यायचे नाही, ऐकायचे नाही
 • आम्ही काँग्रेसने ठरवलेल्या दरापेक्षा 9 टक्के स्वस्त दराने राफेल विमाने खरेदी केली आहे
 • काँग्रेस पक्षाने आधी अभ्यास करावा, मग बोलावे
 • काँग्रेसने राफेलच्या किंमती दरवेळा वेगवेगळ्या सांगितल्या
 • एका काँग्रेस खासदाराने हवाई दलप्रमुखांना खोटारडे म्हटलं, एका काँग्रेस नेत्याने मोदी सरकार उलथवून टाकण्यासाठी पाकिस्तानची मदत मागितली (नवज्योतसिंग सिद्धूचे नाव न घेता टीका)
 • आम्ही चर्चा करण्यासाठी तयार होतो, उत्तर देत होतो, पण विरोधक फोटो काढत होते, विमाननं उडवत होते
 • आम्ही वेळोवेळी स्पष्टीकरण देतो मात्र ते ऐकायला तयार नाहीत
 • लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी राहुल गांधी यांची समजूत काढली
 • संरक्षण मंत्र्यांच्या विधानानंतर राहुल गांधी आणि काँग्रेस आक्रमक
 • संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी राहुल गांधी यांनी 20 जुलै रोजी संसदेत केलेल्या विधानाचा उल्लेख केला
 • काँग्रेस देशाची दिशाभूल करत आहे, राफेल विमानांची संख्या कमी केली नाही तर ती वाढवली
 • काँग्रेस देशातील जनतेची दिशाभूल करते आहे
 • पण त्यांनी फक्त 18 विमानं मागवली होती आम्ही 36 केली आहे
 • पंतप्रधानांना संख्या कमी करण्याचे अधिकार कुणी दिले असे विचारतात…
 • एचएएलची क्षमता आता आम्ही वाढवली आहे. तेजसची संख्या 8 वरून 18 वर नेली
 • आम्ही एचएएलला 1 लाख कोटी दिले
 • एचएएलला ताकदवान करण्यासाठी तुम्ही काही केले नाही आणि आता तुम्ही मगरीचे अश्रू ढाळले
 • स्थायी समितीच्या अहवालातून वाचन करते आहे
 • दसॉल्टने HAL ने बनवलेल्या विमानांची खात्री देण्यास नकार दिला होता
 • काँग्रेस हिंदुस्थान अॅरोनॉटीक्स लिमिटेड (HAL) साठी मगरीचे अश्रू ढाळतेय
 • एचएएलचे नाव यामध्ये नव्हते
 • त्यांची पोलखोल होईल म्हणून ते आता गोंधळ घालत आहेत
 • कोणाला काही मिळालं नाही म्हणून तुम्ही करार थांबवला
 • स्वतंत्र पर्यवेक्षकाने मंजूरी दिल्यांनतर त्यांनी प्रक्रिया पूर्ण करून विमानं आणली नाही
 • त्यांच्या कार्यकाळात विमानं आली नाहीत, आमचं सप्टेंबरमध्येच येणार
 • डिल इन डिफेन्स, डिल विथ डिफेन्स यामध्ये फरक आहे
 • काही घडेपर्यंत, मिळेपर्यंत विमान खरेदी करण्याची त्यांची मानसिकताच नव्हती
 • जी प्रक्रिया 10 वर्षांत आधीच्या सरकारने केली नाही ती आम्ही 14 महिन्यांत केले
 • आमच्या सरकारने केलेल्या करारा नुसार पहिले राफेल विमान या वर्षी सप्टेंबरमध्ये येणार, तीन वर्षांत सर्व विमानं येणार
 • विरोधकांचा गोंधळ, राफेलवर बोलण्याची केली मागणी
 • राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे कौतुक आहे, पण त्यांनी त्यांच्या 11 वर्षांच्या कालावधित काय केले?
 • आपण मात्र काहीच पाऊले उचलली नाही
 • पाकिस्तानने आपल्या विमानांची संख्या दुप्पट केली
 • चीनने 2004 ते 2015 मध्ये 400 विमाने खरेदी केली
 • आपल्या देशाच्या शेजारी राष्ट्रांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
 • पण त्यामधून सत्य समोर यावे
 • संरक्षणाच्या मुद्यावर चर्चा व्हायलाच हवी
 • मी इथे सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी उभी आहे
 • संरक्षण मंत्री सीतारमण उत्तर देणार
आपली प्रतिक्रिया द्या