LIVE – आघाडीची चर्चा सकारात्मक, लवकरच महाराष्ट्रात स्थिर सरकार – पृथ्वीराज चव्हाण

3164

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक सुरू होती. तब्बल तीन तास ही बैठक सुरू होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ आणि काँग्रेसचे सात प्रमुख नेते उपस्थित होते.

लाईव्ह पत्रकार परिषद –

  • पवारांसोबत बैठकीनंतर काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेनुगोपाल यांनी सोनिया गांधींचे घेतली भेट

  • तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय पर्यायी सरकार बनणार नाही – नवान मलिक
  • शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि महाराष्ट्रासाठी पर्यायी सरकार मिळण्यासाठी चर्चा झाली – नवाब मलिक

  • लवकरच स्थिर आणि लोकाभिमूख सरकार येईल – पृथ्वीराज चव्हाण

  • आज आणि उद्या चर्चा सुरू राहिल – पृथ्वीराज चव्हाण
  • महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये प्रदीर्घ चर्चा
  • महाराष्ट्रात 21 दिवसांपासून जी अस्थिरता संपवण्यासाठी चर्चा – पृथ्वीराज चव्हाण

याआधी दिल्लीत होणाऱ्या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार नाहीत अशी बातमी आली होती. परंतु पवारांनी अचानक बैठकीला हजेरी लावली. या बैठकीमध्ये किमान समान कार्यक्रमावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, ‘या’ गोष्टींवर झाली 45 मिनिटे चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत चर्चा केली. कोणत्याही एकाच पक्षाकडे बहुमत नसल्याने सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला पेच सुटावा यासाठी शिवसेनेसोबत मिळून सरकार स्थापन करण्याबाबत मुंबईत यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांत दिल्लीत बैठकांची सत्रे सुरू आहेत.

काँग्रेस नेते अहमद पटेल, ए. के. अँटोनी, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आदी नेत्यांनी मंगळवारी सोनिया गांधी यांची भेट घेऊन चर्चा केली. राज्यातील काँग्रेसचे बहुसंख्य आमदार हे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून सरकार बनवावे या मताचे आहेत. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्षांनी लककरात लवकर घ्याका. सत्तास्थापनेला उशीर झाल्यास नुकसान होण्याची भीती या नेत्यांनी यावेळी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या