Live Corona update – मुंबईत कोरोनाचे 714 रुग्ण, आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू

3229
 • दिल्लीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 669 वर
 • अंदमान निकोबारमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 11 वर
 • रत्नागिरीत कोरोनाचा पहिला बळी, खेड येथे उपचार सुरु असताना कोरोनाग्रस्ताचा मृत्यू
 • सांगली जिल्ह्यातील एकूण 25 कोरोना बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत दहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उर्वरित बाराजणांची स्वॅब टेस्टचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे उद्या  रात्रीपर्यंत दुसरा रिपोर्ट येईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिली.
 • जम्मू कश्मीरमध्ये 158 कोरोनाचे रुग्ण
 • महाराष्ट्र अद्याप तिसऱ्या टप्प्यात नाही, मुंबई, नागपूर, पुणे या शहरात आकडा वाढतोय – आरोग्यमंत्री

 • राज्यात आज 117 नवीन रुग्ण आढळले, 8 मृत्यू; एकूण रुग्णांचा आकडा 1135 – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

 • राजस्थानमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 348 वर

 • संभाजीनगरमध्ये महापालिकेच्यावतीने महिलांसाठी विशेष कवारांटाइन सेंटर,26  खोल्यांची आपत्कालीन व्यवस्था करण्यात आली आहे
 • रॅपिड टेस्ट किटला परवानगी मिळेल तेव्हा ती जास्तीत जास्त प्रमाणात महाराष्ट्रात आणल्यानंतर चाचण्यांना सुरुवात होईल
 • घरोघरी जाऊन आता चाचणी करतोय, चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे
 • महाराष्ट्रात 610 लोकांना आजाराची सौम्य लक्षणे आहेत. 26 जणांना गंभीर स्वरुपाची लक्षणे आहेत
 • आरोग्यसेवेसाठी प्रशिक्षत असलेल्यांनी किंवा अनुभव असलेल्यांनी या ईमेल आयडीवर संपर्क साधा [email protected] 
 • आरोग्य सेवेत काम केलेल्या निवृत्त सैनिक, निवृत्त वॉर्डबॉय, परिचारिका, प्रशिक्षित लोकांची काम करण्याची तयारी असेल तर मी आवाहन करतोय, की महाराष्ट्राला आपली गरज आहे- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
 • ही तपासणी केंद्र प्रत्येक विभागात असतील
 • सर्दी,खोकला, ताप असलेल्यांनी तापासाठीच्या विशेष रुग्णालयात जाऊन तपासणी करा
 • फेकून द्यायचे मास्क फेकण्यापूर्वी जाळून टाकून त्याची राख सुरक्षित ,मोकळ्या जागेत टाका
 • एकमेकांचे मास्क वापरू नका
 • घराबाहेर पडणार असाल तर मास्क वापरा
 • पीपीई किटसारख्या गोष्टी राज्यात बनवायला लागलो आहोत
 • काही कंपन्यांनी व्हेंटीलेटर बनवून त्याच्या चाचण्या सुरु केल्या आहेत
 • वैद्यकीय उपकरणांचा जगभरात तुटवडा आहे
 • केंद्राकडे तांदुळाप्रमाणेच इतरही धान्याची केंद्राकडे मागणी केली आहे
 • केशरी शिधापत्रकधारकांना 3 किलो गहू 8 प्रति किलो दराने तर 2 किलो तांदूळ 12 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध केला जात आहे
 • मी काल पंतप्रधानांना पत्र लिहलंय, फोन केला आहे
 • केंद्राच्या योजनेत फक्त तांदुळाचा समावेश आहे
 • केंद्राकडून चांगलं सहकार्य मिळतंय
 • अन्नदानावेळी यामध्ये जात,पात, धर्म आपल्या राज्यातला का बाहेरचा याचा विचार करत नाही
 • साडेपाच ते सहा लाख लोकांना आपण तीन वेळचे अन्न देत आहोत
 • हे दिवस असे राहणार नाही, या दिवसांमधून आपण बाहेर पडणार हे नक्की आहे
 • वुहानमध्ये सगळे निर्बंध उठवण्यात आले आहेत, ही दिलासादायक बातमी आहे
 • युद्ध जिंकल्यानंतर अर्थव्यवस्थेसंदर्भातील युद्धासाठी आपण तयार पाहिजे
 • घरी राहा तंदुरुस्त राहा, ज्यांना शक्य असेल त्यांनी घरातल्या घरात व्यायाम करा
 • एकाही रुग्णाची वाढ झालेली मला नकोय
 • कोरोना आपल्या मागे लागलोय, आपण कोरोनाच्या मागे हात धुवून लागूया
 • मंगळवारी पहिला रुग्ण सापडल्यानंतर 4 आठवडे पूर्ण झाले- मुख्यमंत्री
 • मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवेदन

CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State

Posted by CMOMaharashtra on Wednesday, April 8, 2020

 • जयसिंगपूरमधील 72 वर्षीय वृध्दाचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह
 • गेल्या काही तासात पुण्यात कोरोनाने 5 जणांचा मृत्यू

 • महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1078 वर

 • दिल्लीत सध्या 576 कोरोनाग्रस्त, त्यातील 35 जणांवर आयसीयूत उपचार सुरू, 8 जण व्हेंटिलेटरवर

 • धारावीत आणखी दोन कोरोनाग्रस्त आढळले

 • आंध्र प्रदेशमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 329 वर
 • पिंपरीत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील महापालिका रुग्णालयातील डॉक्टरानंतर 50 कर्मचारीही ‘निगेटीव्ह’
 • हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांचा कोरोनाने मृत्यू

 • पुण्यात कोरोनाने दोघांचा मृत्यू

 • गेल्या 24 तासात कोरोनाग्रस्तांची संख्या 773 ने वाढली, 10जणांचा मृत्यू

 • देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 5194, मृतांचा आकडा 149 वर

 • बीड जिल्ह्यातील पिंपला गावात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यामुळे या गावा भोवतीचा चार किमीचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला तर पाच गावे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
 • पुण्यात कोरोनामुळे 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

 • नागपूरमध्ये तबलिगी जमातच्या 8 परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल.

 • बिहारमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 38 वर
 • भायखळ्याच्या बाजारात सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी

 • बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये एक जण कोरोना पॉझिटिव्ह
 • अमेरिकेत गेल्या 24 तासात कोरोनामुळे 2000 जणांचा मृत्यू

 • मध्य प्रदेशमधील कोरोनाग्रस्तांची संख्या 173 वर

 • महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या हजाराच्या पार, आकडा 1018 वर
आपली प्रतिक्रिया द्या