Live corona update – राज्यात 1346 कोरोनाबधित रुग्ण, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

 • प्रभावी लॉकडाऊनसाठी एसआरपीएफ, सीसीटीव्ही व ड्रोनचा वापर करण्याबाबत बैठकीत एकमत झाले.
 • कोरोनाबाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
 • राज्यात 1346 कोरोनाबधित रुग्ण असून मुंबईत 746 कोरोनाबाधीत आढळले आहेत.
 • मुंबईत आज 9 जणांचा मृत्यू झाला, एकूण मृतांची संख्या 54 झाली, मुंबई महानगरपालिकेची माहिती
 • मुंबईत आज 79 नवीन रुग्ण आढळले असून एकूण आकडा 775 झाला
 • देशात 24 तासात 591 नवीन रूग्णांची भर, 20 जणांचा मृत्यू; एकूण आकडा 5865 वर पोहोचला, आरोग्य मंत्रालयाची माहिती

 • जम्मू कश्मीरमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 184 वर
 • धारावीतील एका कोरोनाग्रस्त 70 वर्षीय महिलेचा मृत्यू
 • देशात जवानांसारखे कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांना समाजानेही साथ दिली पाहिजे – आरोग्य मंत्रालय
 • हिंदुस्थानी रेल्वेकडून अडीज हजार डॉक्टर व 35000 पॅऱामेडिक्स पुढिल परिस्थितीसाठी सज्ज आहेत
 • 49 हजार व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देण्यात आली आहे
 • 1 कोटी 70 लाख पीपीई किट तयार केले जात आहेत. देशाअंतर्गतच हे किट तयार केले जात आहे. – आरोग्य मंत्रालय
 • महाराष्ट्रातील सर्व आमदारांच्या पगारात पुढिल वर्षभरासाठी 30 टक्के कपात

 • देशातील विमानसेवा, रेल्वे सेवा 30 एप्रलिपर्यंत सुरू न करण्याची ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची मागणी

 • लॉकडाऊन वाढवणारे पहिले राज्य ठरले ओडीशा
 •  ओडीशातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवला – मुख्यमंत्र्याची घोषणा

 • राजस्थानमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 413 वर
 • मुंबई महानगर पालिका दक्षिण कोरियाकडून 1 लाख रॅपिड टेस्टिंग किट विकत घेणार

 • गुजरातमध्ये गेल्या 24 तासात 52 रुग्ण आढळले
 • इंदूरमध्ये कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू
 • महाराष्ट्रात गेल्या 24 तासात आढळले 162 रुग्ण, एकट्या मुंबईत 143 रुग्ण वाढले

 • देशातील मृतांचा आकडा 166 वर
 • देशात गेल्या 24 तासात 540 कोरोनाग्रस्तांचा वाढ, आकडा 5734 वर

 • झारखंडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण, राज्याचा आकडा 13 वर
 • अमेरिकेत सलग दुसऱ्या दिवशी दोन हजार जणांचा मृत्यू

 • सफदरजंग रुग्णालयाच्या डॉक्टरांना शेजाऱ्यांकडून मारहाण, कोरोना पसरवत असल्याचा केला आरोप

आपली प्रतिक्रिया द्या