Live Corona Update -मुंबईत आढळले 103 कोरोनाचे रुग्ण, रुग्णांची संख्या 433

3337
  • मुंबईत आज कोरोनाचे 103 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 433 वर गेली आहे. तसेच आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला असून 54 रुग्ण बरे झाले आहेत.

 • देशात एकूण 27 हजार 661 छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 23 हजार 924 छावण्या सरकारने तर 3 हजार 737 बिगर शासकीय संस्थांनी सुरू केल्या आहेत. या छावण्यात 12 लाख 50 हजार लोकांनी आश्रय घेतला आहे. – गृह मंत्रालय
 • देशात 274 जिल्हे कोरोनाने प्रभावित झाला आहे. आरोग्य विभाग
 • विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवरील बचत गटांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मास्कची निर्मिती सुरू
 • या प्रसंगी आपला जीव पणाला लावून रुग्णांची सेवा करणाऱ्यांचे आरोग्य मंत्र्यांकडून कौतूक
 • केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी विविध रुग्णालयांना भेट देऊन कामाचा आढावा घेतला
 • विमा कंपन्यांना नवीन विमा योजनेची मााहिती देण्याचे केंद्राचे आदेश
 • तसेच, धूम्रपान, मद्यपान, तंबाखू किंवा अन्य पदार्थांचं सेवन टाळावं.
 • सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळेही कोरोना पसरतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकणं टाळावं
 • कोविडच्या चाचण्यांसंबंधीच्या ज्या नवनवीन पद्धती समोर येत आहेत, त्यांच्या नोंदणीविषयी मार्गदर्शन केले.
 • त्यांना स्थानिक पातळीवर काय उपाय करण्यासंबंधी सूचना आणि मार्गदर्शन केले.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक पातळीवर कोरोना प्रतिबंध करण्यासाठीच्या विशेष पथकांची बैठक घेतली
 • यासाठी देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन योजना कोविड 19 बनवण्याची शिफारस
 • कोरोनासंबंधीत उपाययोजनांवर सूसूत्रता राखण्याचे केंद्राच जिल्हा प्रशासनांना आदेश
 • आतापर्यंत देशात 274 जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त सापडले, आरोग्य मंत्रालयाची माहिती
 • यात प्रामुख्याने ज्या भागात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण सापडलेत, त्या स्थानिक प्रशासनांनी उपयोगात आणलेल्या योजना सांगितल्या.
 • स्थानिक प्रशासनांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे कोरोना नियंत्रणासाठीच्या उपायांची देवाण-घेवाण करण्यात आली.
 • देशातील सर्व फार्मा कंपनी सुरळीत चालू ठेवण्याचे स्थानिक प्रशासनांना आदेश
 • तबलिगी जमात प्रकरण झालं नसतं तर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढण्याचा वेग कमी झाला असता
 • आतपर्यंत 79 मृत्यू तर 267 जण बरे होऊन घरी परतले- आरोग्य मंत्रालयाची माहिती
 • गेल्या 24 तासांत देशात 472 नवीन कोरोनाग्रस्त
 • त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नऊ झाली असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.
 • बुलडाण्यात रविवारी सकाळी तीन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दुपारी आणखी एक जण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल मिळाला आहे.
 • बुलडाणा- चिखली येथे पुन्हा एक कोरोना रूग्ण, जिल्ह्यात कोरानाबाधितांची संख्या नऊ
 • धारावीत 14 रुग्ण असल्याची माहिती चुकीची, पालिकेचं स्पष्टीकरण
 • मुंबईतील धारावी भागात सापडला कोरोनाचा आणखी एक रुग्ण
 • निजामुद्दीन येथील मर्कजमध्ये फोरेन्सिक टीम दाखल, प्रकरणाचा तपास करणार
 • आठ मलेशियन तबलिगींना क्वारंटाईन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
 • फिलीपिन्सच्या दहा नागरिकांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल
 • महाराष्ट्रात कोरोनाचे 26 नवीन रुग्ण, रुग्णांचा आकडा 661वर
 • हरिद्वार येथे तबलिगी समाजाच्या मर्कजवरून परतलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याने होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
 • दिल्लीतील कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे दोन वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
 • राजस्थानमध्ये 6 नवीन रुग्ण सापडले, पैकी एक मर्कजहून परतलेला रुग्ण
 • या सीआरपीएफ आरोग्य अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या 20 जणांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत.
 • सीआरपीएफच्या अधिकृत सूत्रांची माहिती
 • सीआरपीएफच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्याखेरीज अन्य कुणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत.
 • लॉकडाऊनमुळे गंगेच्या प्रदूषण पातळीत 40 ते 50 टक्क्यांनी घट
 • गुजरात येथे 61 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू
 • पाकिस्तानात आतापर्यंत 41 जणांचा कोरोनाने मृत्यू
 • पाकिस्तानात 2818 जणांना कोरोनाची लागण. पैकी 1131 पंजाबचे, 839 सिंधचे, 383 खैबर पख्तुनवाचे, 175 बलोचिस्तान, 193 गिलगिट बाल्टिस्तान तर 75 इस्लामाबाद आणि 12 जण पाकव्याप्त कश्मीरचे.
 • मध्य प्रदेशमध्ये कोरोनाचे आणखी तीन रुग्ण

 

आपली प्रतिक्रिया द्या