Live Corona Update- देशात 24 तासात कोरोनाचे 704 रुग्ण, 28 जणांचा मृत्यू

6158
 • देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 704 रुग्ण आढळले आहेत. तसेच देशातील एकूण रुग्णांची संख्या 4 हजार 281 वर पोहोचली आहे, तर 28 जणांचा मृत्यू झाला आहे.  कोरोनामुळे आतापर्यंत 111 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

 • नालासोपार्‍यात 38 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर नायर इस्पितळात दाखल करण्यात आले होते. आज या महिलेचा मृत्यू झाला आहे अशी माहिती वसई विरार महानगरपालिकेने दिली आहे.

 

 • सध्या राज्यात शासकीय आरोग्य यंत्रणेकडे 35 हजार पीपीई कीटस्, तीन लाखाच्या आसपास एन 95मास्क, 20 लाख ट्रीपल लेअर मास्क, 1300 व्हेंटिलेटर्स उपलब्ध- आरोग्यमंत्री
 • कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यामध्ये पुरेशा प्रमाणात साधनसामग्री उपलब्ध. मात्र, आपत्कालीन स्थिती ओढवल्यास खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाकडे सव्वा तीन लाख पीपीई कीटस्, नऊ लाख एन 95 मास्क आणि 99 लाख ट्रिपल लेअर मास्कची मागणी- आरोग्यमंत्री
 • तेलंगणातील लॉकडाऊन 3 जूनपर्यंतचा वाढविण्याचा अद्याप निर्णय नाही – मुख्यमंत्री के चंद्रशेखऱ राव यांनी केले स्पष्ट
 • तेलंगणातील लॉकडाऊन 3 जूनपर्यंत वाढवले, मुख्यमंत्री के चंद्रशेखऱ राव यांची घोषणा

 

 •  महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 868 वर

 • 15 तारखेनंतर लॉकडाऊन हे 100 टक्के शिथिल होईल, असे कोणी डोक्यात ठेऊ नये. अनेक देशांचे केस स्टडीज करून लॉकडाऊन कसे शिथिल करता येईल यावर अभ्यास सुरू आहे. केंद्र शासन याबाबत आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे- आरोग्यमंत्री राजेश टोपे
 • महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा मृत्युचा आकडा दुपट्टीने वाढलाय – आरोग्यमंत्री
 • महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये एकूण 4653 मदत केंद्रे स्थापन केली आहेत. यामध्ये 4,54,142 स्थलांतरित मजूर आणि कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच 5,53,025 मजूर आणि बेघर लोकांना जेवण पुरवण्यात आले आहे.
 • महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 45 वर – आरोग्यमंत्री
 •  देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 4281, मृतांचा आकडा 111 वर

 • आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 303 वर
 • दिल्लीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 523 वर, त्यातील 330 हे तबलिकी जमातमधील
 • श्री राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान सहाय्यता निधाला 25 लाखांचा निधी
 • दिवे लावण्या ऐवजी बंदुकीतून गोळीबार करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्तीविरोधात गुन्हा दाखल, पक्षाातून केले निलंबीत
 • देशभरात कोरोनाने आतापर्यंत 109 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 7 टक्के लोकं हे चाळीशीच्या खालचे होते. तर 63 टक्के नागरिक हे साठी ओलांडलेले आहेत
 • पाच लाख टेस्टिंग किटची ऑर्डर देण्यात आली असून 8 एप्रिलपर्यत 2.5 लाख किट डिलिव्हर होणार – आरोग्य मंत्रालय
 • गुजरातमध्ये 14 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण

 • प्रकाश जावडेकर यांची माहिती
 • खासदारांना देण्यात येणारा खासदार निधी देखील कमी होणार,
 • माजी खासदारांच्या पेन्शमध्येही 30 टक्के कपात होणार

 • राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल व सर्व खासदारांच्या पगारात वर्षभरासाठी 30% कपात

 • पश्चिम डोंबिवलीत एकाचा मृत्यू, कोरोनासदृश्य होती लक्षणं
 • आचरा रामेश्वर देवस्थानची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपयांची मदत
 • कल्याण-डोंबिवलीत कोरोना झालेल्या रुग्णाचा आकडा वाढला, डोंबिवलीत 4 तर , कल्याण मध्ये 2 नवीन रुग्ण
 • या तरुणाला आता 19 एप्रिलपर्यंत घरात राहण्याच्या सक्त सुचना
 • डोंबिवलीच्या लग्नातून  कोरोनाचा संसर्ग पसरवणाऱ्या तरुणाला डिस्चार्ज… या तरुणाच्या दोन चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
 • ठाण्यात आता 21 कोरोनाबाधित
 • रुग्णाच्या संपर्कात जे कोणी आले आहेत त्यांना देखील क्वारंटाईन केले आहे.
 • त्याला होराईझन या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे..
 • या ठिकाणी दुबई येथून एक कुटुंब आले होती, त्यातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला.
 • वृंदावन भागात 200 इमारती आहेत,
 • पुढील आदेश येईपर्यंत सदर इमारत सील राहील…
 • त्यामुळे सदर परिसरातील इमारत क्रमांक 54 a व b सुरक्षेच्या करणास्तव सील करण्यात आली आहे.
 • ठाणे महानगर पालिका उथळसर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या वृंदावन सोसायटी येथे कोरोनाग्रस्त व्यक्ती आढळली.
 • लॉकडाऊन काळात होणारी गर्दी रोखण्यासाठी उचलले पाऊल
 • हा नियम 7 एप्रिलपासून लागू होणार; मेडिकल स्टोअर्स, रुग्णालये, दवाखाने मात्र सुरू राहणार
 • आता भाजीपाला, दुधदुभते, किराणा इत्यादी आवश्यक सेवा सायंकाळी पाच ते पहाचे पाच वाजेपर्यंत बंद राहतील.
 • जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 12 तास बंद राहणार, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निर्णय
 • फेेरीवाला, दुकाने सर्वकाही बंद ठेवण्याचा स्थानिकांचा सहमतीने निर्णय
 • मुंबई – माहीम मच्छिमार कॉलनीत कडकडीत लॉकडाऊन
 • या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेही उपस्थित होते.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांच्या समितीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली
 • कोरोनाग्रस्तांकरिता नगर जिल्हा बँकेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 लाख रुपयांची मदत
 • शेट्टी यांच्या जगन्नाथ शेट्टी फाउंडेशनच्या वतीने ही मदत करण्यात आली
 • त्या आवाहनाला पुणे येथील प्रसिद्ध ‘हॉटेल वैशाली’चे मालक जगन्नाथ शेट्टी यांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला एक कोटी रुपयांची मदत केली आहे.
 • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19’ला मदत करण्याचे आवाहन केले होते.
 • मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पुण्याच्या ‘हॉटेल वैशाली’तर्फे 1 कोटींची मदत
 • उत्तर प्रदेश- खैराबाद येथील तबलिगी जमातचे 8 जण कोरोनाग्रस्त
 • उत्तराखंड येथील अलमोरा येथे तबलिगी समाजाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका व्यक्तिला कोरोनाची लागण
 • पुण्यात 19, मुंबईत 11, सातारा, नगर आणि वसईत प्रत्येकी एक रुग्ण
 • महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 781वर, 33 नवीन रुग्ण सापडले
 • 292 जणांना मिळाला डिस्जार्ज तर 109 जणांचा मृत्यू
 • देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 4097, गेल्या 12 तासांत 490 रुग्ण वाढले
 • गायिका कनिका कपूरची कोरोना चाचणी निगेटिव्ह, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
 • भोपाळमध्ये कोरोनाचा पहिला बळी, 62 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
 • प्रयागराज येथे विलगीकरण कक्षात उपचार सुरू
 • मरकज येथे उपस्थित असलेल्या तबलिगी जमातच्या इंडोनेशियन नागरिकांना कोरोनाची लागण
 • मंत्रालयातील कर्मचारी, अधिकारी आणि कामानिमित्त येणाऱ्यांसाठी पुढील काही महिने मास्क घालून येणं बंधनकारक
 • गेल्या 24 तासात अमेरिकेत 1200 मृत्यू
 • कोरोनाने देशासह जगभरात हाहाकार माजवला आहे.
आपली प्रतिक्रिया द्या