
- दिवाळीपूर्वी महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होणार
- दोन्ही राज्यातील निवडणुका एकाच टप्प्यात होणार
- महाराष्ट्र आणि हरयाणा दोन्ही राज्यात एकाच तारखेला मतमोजणी होणार
- महाराष्ट्र आणि हरयाणा दोन्ही राज्यात एकाच तारखेला मतदार होणार
- 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रात निवडणुका होणार, 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार
- अर्ज दाखल करण्यासाठीची शेवटची मुदत ४ ऑक्टोबर
- देशात 64 ठिकाणी लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार
- गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येणार
- निवडणुकमध्ये प्लॅस्टीकचा वापर टाळावा-मुख्य निवडणूक आयुक्त
- उमेदवारांनी त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती न दिल्यास उमेदवारी अर्ज रद्द केला जाणार
- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्हीव्हीपॅट पावत्यांची आणि मतांशी सांगड घालून मोजणी केली जाणार
- महाराष्ट्रात 1.8 लाख ईव्हीएमचा वापर केला जाणार
- महाराष्ट्रातील उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी 2 विशेष अधिकारी पाठवणार
- महाराष्ट्रात 8.94 कोटी मतदार
- महाराष्ट्रात 288 जागांसाठी निवडणूक होणार, निवडणुकीच्या तारखा लवकरच घोषित केल्या जाणार
- देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली
- महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये ऑक्टोबर महिन्यात तर झारखंडमध्ये डिसेंबर महिन्यात निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे
- महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन राज्यांशिवाय झारखंडमध्येही निवडणुका होणार आहे.
- देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची पत्रकार परिषद
- तीन राज्यातील निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार.
- निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद.
आपली प्रतिक्रिया द्या