INDvsAUS वॉर्नर-फिंचचे वादळी शतक, ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियावर 10 विकेट्सने विजय

1896

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघातील तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर रंगला. एकतर्फी झालेल्या या लढतीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 10 विकेट्सने पराभव केला.

टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 256 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 38 व्या षटकात गाठले. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हीड वॉर्नरने 112 चेंडूत 17 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 128 धावांची खेळी केली, तर कर्णधार अॅरॉन फिंचने 114 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 110 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने हा सामना 10 विकेट्सने जिंकत मालिकेत 1-0 आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना 17 जानेवारीला राजकोट येथे होणार आहे.

… म्हणून पंत पुन्हा मैदानात उतरला नाही, राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना सर्व बाद 255 धावा करत ऑस्ट्रेलियासमोर 256 धावांचे आव्हान ठेवले आहे. शिखर धवन (74) आणि लोकेश राहुल (47) या दोघांव्यतिरिक्त इतर फलंदाज मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला. पंतने 28 आणि जाडेजाने 25 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून स्ट्रार्कने सर्वाधिक 3 बळी घेतले. पॅट कमिन्स आणि रिचर्डसनने प्रत्येकी 2, तर झंपा आणि अॅगरने प्रत्येकी 1 बळी घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या