Kolkata BJP-TMC Violence …तर मी काल जिवंत राहिलो नसतो, अमित शहांचा गंभीर आरोप

amit-shah

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान कोलकाता येथे प्रचंड गोंधळ उडाला. काठ्या भिरकावण्यात आल्या. दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. भाजप, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे कार्यकर्ते भिडले. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला. या सर्व प्रकरणावर अमित शहा हे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत…

LIVE UPDATE

 • पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोग सुरुवातीपासून पक्षपातीपणे वागतोय
 • पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्याची गरज नाही, 23 तारखेनंतर तिथलं शासन जनताच बदलेल
 • काल CRPF चे जवान नसते, तर मी तिथून जिवंत बाहेर पडू शकलो नसतो
 • कोणीही कितीही आघाडी करावी, विरोधी पक्षाचा नेता निवडण्यासाठी ते हे करू शकतात, अमित शहांचा टोला
 • भाजप 300 पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील
 • ममता बॅनर्जी यांनी खुलेआम धमकी दिली आहे, त्यांच्यावर निवडणूक आयोगाने बंदी का घातली नाही?
 • निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे- अमित शहा
 • पश्चिम बंगालमध्ये गुंडांना अटक करण्यात आली नाही, त्यांना अटक करण्याचे निर्देश निवडणूक आयोग का दिले नाही
 • निवडणूक आयोग मूकप्रेक्षक बनली आहे, पश्चिम बंगालमध्ये बोगस वोटींग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत
 • बंगालमध्ये TMC पराभूत होणार असल्याचं स्पष्ट दिसायला लागलं आहे
 • पुतळा तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी तोडला
 • कॉलेज उघडलं कोणी? खोलीची चावी कोणी दिली ? खोलीतील पुतळा कसा काय तुटला? अमित शहांचे प्रश्न
 • साडेसात वाजता कॉलेज बंद झालं होतं, त्यातल्या खोलीत ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा होता
 • तृणमूल काँग्रेस खोटं बोलून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे
 • ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा भाजप कार्यकर्त्यांनी तोडला नाही
 • मंगळवारी तीन हल्ले झाले, पोलीस मूकदर्शक होते-अमित शहा
 • लोकशाहीचा गळा आवळण्याचे प्रकार पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे
 • भाजपने जर हिंसाचार केला असता तर तो सगळ्या राज्यात झाला असता- अमित शहा
 • थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होणार