पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर निशाणा, मतांसाठी चुकीची विधानं करू नये

3751
pm-narendra-modi-nashik

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज नाशिक येथे झाला. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती होती. नरेंद्र मोदींच्या भाषणाने भाजपने विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ वाढवला.  नाशिककरांच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेला साद घातली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं.

भाषणात बोलतांना त्यांनी कश्मीरच्या प्रश्नावरून विरोधकांच्या विधानांचा चांगलाच समाचार घेतला. कश्मीरची जनता 40 वर्ष काँग्रेसच्या सरकाच्या चुकीच्या निर्णयांची फळं भोगत होती. आता कलम 370 हटवून आम्ही त्यांच्या आशा-आकांक्षांना बळ देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र विरोधकांना हे पटत नाही. काँग्रेसचा संभ्रम, अडणच मी समजू शकतो. पण शरद पवार यांचं काय? त्यांच्यासारखा अनुभवी नेता केवळ मतांसाठी चुकीची विधान करतो? अशी चुकीची विधान त्यांनी करू नयेत, असे म्हणत मोदींनी शरद पवारांवर टीका केली.

पाहा भाषणाचा व्हिडीओ

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 • जय भीम, जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय घोषणा देत मोदींनी भाषण पूर्ण केले
 • चला पुन्हा आणुया आपलं सरकार
 • आमचा विश्वास सर्वोच्च न्यायालयावर आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आहे
 • सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराचा विषय आहे, मग विधानं कशाला करतात
 • नाशिक रामाची भूमी आहे, काही लोकांनी काही दिवसांपासून राम मंदिराविषयी बोलत आहेत
 • महाराष्ट्र पुन्हा लोडशेडींगमध्ये जाऊ नये म्हणून हेच सरकार पुढे निवडून देणे गरजेचे आहे
 • देशातील चार लॉजिस्टिकहब पैकी एक नाशिकला देणार
 • नाशिक संरक्षण क्षेत्रात मोठं योगदान देणार आहे
 • वीर सावरकरांना जन्म देणारी महाराष्ट्राची भूमी आहे, महात्मा फुले, बाबासाहेबांची ही भूमी आहे
 • शरद पवार तुम्ही काहीही बोला मात्र साऱ्या जगाला माहीत आहे, दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे!
 • विरोधकांनी मतांसाठी चुकीची विधानं करू नये
 • काँग्रेसची मजबूरी मी समजू शकतो, पण शरद पवार तुमच्या सारखा नेता पाकिस्तानचं कौतुक करतो?
 • मात्र विरोधक, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस संभ्रम निर्माण करत आहेत
 • त्यांना विकास हवा आहे, त्यामुळे संपूर्ण देश आता त्यांच्या सोबत आहे
 • 40 वर्ष कश्मीरी लोक दिल्ली सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे यातना भोगत होते, मात्र आता त्यांचे स्वप्न पूर्ण होतील
 • तुम्ही कश्मीरच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे या
 • कश्मीर हमारे है अशा घोषणा दिल्या होत्या, आता नवा कश्मीर निर्माण करायचा आहे, अशा घोषणा द्या
 • या निर्णयामुळे जम्मू-कश्मीरमधील स्वप्न-आकांशा पूर्ण होतील
 • आम्ही जम्मू-कश्मीरसाठी नवे प्रयत्न करू, आज त्या स्वप्नांना साकार करण्याच्या दिशेने देश चालू लागला आहे
 • देशाच्या सुरक्षेला भाजप सरकारचे प्राधान्य असेल
 • पण आमचे एनडीए सरकार आल्यानंतर आम्ही बुलेटप्रुफ जॅकेट खरेदी प्रक्रिया गतीमान केली
 • 2009 मध्ये बुलेटप्रुफ जॅकेट नसल्याने आमचे वीर शहीद झाले, पण पुढे पाच वर्ष काँग्रेस-एनसीपी सरकारने जॅकेट घेतले नाही
 • राफेल देखील लवकरच दाखल होणार आहे
 • सैन्याला सशक्त करण्यासाठीचे वचन दिले होते, त्यासाठी दोन आधुनिक हेलिकॉप्टर सैन्यात दाखल झाले
 • पशूधन चांगले राहिले पाहिजे म्हणून लसीकरण सुरू केले आहे, यात आमचा राजकीय हेतू नाही
 • वीज, पाणी पोहचवू त्यासाठी आम्ही पाऊले उचलले
 • आम्ही जे वचन दिले होते, ते पूर्ण केले
 • प्रॉमिस, परफॉर्मन्स, आणि डिलिव्हरी हे या सराकारचे सूत्र आहे
 • विविध समाजांना न्याय मिळाला, ही पाच वर्षांची केवळ उपलब्धी नाही तर फडणवीस सरकारचा रिपोर्ट कार्ड आहे
 • शेतकऱ्यांना मदत मिळाली, महिलांना धुरापासून मुक्ती मिळाली, पाण्याचा संघर्ष कमी झाला
 • गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राला पारदर्शी कारभार असलेले सरकार, प्रशासन मिळाले
 • 60 वर्षांनंतर पहिल्यांदाच जनतेने लोकसभेत आधीचेच सरकार पुन्हा एकदा जास्त जागांवर जिंकून आले
 • महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना आशीर्वाद दिले
 • देवेंद्रजींनी महाराष्ट्राला स्थिर सरकार आणि दिशा दिली
 • अनेक महापुरुषांची जन्मभूमी महाराष्ट्रात फक्त दोनच मुख्यमंत्री असे ज्यांनी कार्यकाळ पूर्ण केला
 • राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्र मागे राहिला होता
 • महाराष्ट्राने आता ठरवले आशीर्वाद त्यांनाच जे आशेनुसार काम करतील
 • देवेंद्रजी आणि त्यांच्या टीमला महाआशीर्वाद देण्यासाठी ही जनता आली आहे
 • दिंडोरीपेक्षा नाशिकची आजची सभा अधिक मोठी आहे
 • मी दिंडोरीत एका सभेसाठी आलो होतो, त्या सभेतून भाजपला अधिक बळ मिळाले
 • मी देवेंद्रजींसारख्या यात्रेकरूला नमन करण्यासाठी आलो आहे, त्यांच्या यात्रेचं पुण्य, आशीर्वाद मला मिळेल
 • माझ्यासाठी हा क्षण अविस्मरणीय आहे, हा माझा सन्मान देखील आहे आणि माझ्यावर असलेली जबाबदारी देखील आहे
 • छत्रपतींचे वंशज असलेल्या उदयन राजे यांनी माझ्या डोक्यावर पगडी ठेवली
 • मोदींच्या भाषणाला मराठीतून सुरुवात
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात
 • तुमचा जनादेश आहे, तेव्हा भाजप महायुतीचा झेंडा घेऊन विजयी होऊन येतो
 • साडे तीन कोटी रुपयांचा मदतनिधी या यात्रेदरम्यान जमा झाले
 • 140 मतदारसंघात जाऊन आलो, तिथे जोरदार स्वागत झाले
 • जनादेश यात्रेला मिळालेला प्रतिसाद हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील विश्वासामुळे आहे
 • महाराष्ट्राची जनता हे दैवत आहे, त्यांचा आशीर्वाद घेऊन आलो आहे
 • रामराज्यापासून रामराज्यापर्यंतचा हा प्रवास आहे
 • सोशल इंजिनिअरींगमध्ये न बसणाऱ्याला मला मोदीजींनी मुख्यमंत्री बनवले
 • महाराष्ट्रवर भ्रष्टाचारींचा अड्डा असा लागलेला डाग हटवण्याचा आदेश दिला होता, तो पूर्ण केला
 • मोदीजींनी 370 कलम हटवण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल आभार
 • जगभरात प्रसिद्ध असलेले पंतप्रधान मोदींचे स्वागत करतो- मुख्यमंत्री
 • राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला सुरुवात
 • राज्याचे मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं भाषण सुरू
 • नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सभेला संबोधित केलं
 • भाजपमध्ये प्रवेश झालेले उदयन राजे भोसले यांनी मोदींना मानाची पगडी घालून स्वागत केले
 • भाजपच्या नेत्यांकडून पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आले
 • नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन केले
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचले
 • नरेंद्र मोदींच्या गाड्यांचा ताफा सभास्थळाकडे पोहोचला
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये दाखल, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी मोदींचं केलं स्वागत

  Maharashtra: Prime Minister Narendra Modi arrives in Nashik. He will address the concluding rally of ‘Mahajanadesh Yatra’ undertaken by Chief Minister Devendra Fadnavis today. pic.twitter.com/M7l59D0nf9

  — ANI (@ANI) September 19, 2019

आपली प्रतिक्रिया द्या