स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत, आम्ही आमच्या देवतांचा अपमान सहन करणार नाही- उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ रविवारी मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानात धडाडणार आहे. या जाहीर सभेत त्यांनी मिंधे सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला.

 

 • जनतेच्या पाठिंब्यावर आपण लढण्यासाठी तयार आहोत, आता सर्वांची साथ महत्त्वाची आहे.
 • शिवधनुष्य पेलताना रावण उताणा पडला तर तिथे मिंधे कसे टिकणार, तेही उताणे पडणार
 • ही एवढी शक्ती एकवटली तर ते आपले स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही,
 • ही लढाई आपल्या देशाची आहे, लोकशाहीची आहे, शेतकऱ्यांची आहे, त्यात तुम्ही सोबत आहात का
 • 2024 मध्ये निवडणुकीत तुम्ही त्यांना सत्तेवर बसवले, तर या देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत.
 • आपण लोकशाहीसाठी एकत्र आलो आहोत. त्यामुळे आता यात वेगळे फाटे फोडू नका, असे राहुल यांना सांगत आहोत.
 • अंदमानमध्ये त्यांनी 14 वर्षे मरणयातना सोसल्या आहेत. ते येरागबाळ्याचे काम नाही.
 • स्वातंत्र्यवीरांनी 15 व्य़ा वर्षी स्वातंत्र्यांची शपथ घेतली होती.
 • स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे, आम्ही आमच्या देवतांचा अपमान सहन करणार नाही.
 • ही लढाई लोकशीहीची लढाई आहे. राहुल यांच्यासोबत कन्याकुमारीपासून कश्मीरपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत होतो.
 • त्यासाठी गद्दार आधी गुजरातला गेले असावेत, तिथे ते स्वच्छ झाले असावेत.
 • आमच्याकडे निरमा वॉशिंग पाव़डर आहे. इथे माणूस स्वच्छ होतो. असे ते सांगतात.
 • तुमच्या व्यासपीठावर साधूसंत असायचे, ते कोठे गेले आता व्यासपीठावर सर्व संधीसाधू आहेत.
 • लालूप्रसाद यांची गर्भवती सून बेशुद्ध पडेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती, हे कोणते हिंदुत्व
 • आम्ही हिंदुत्वापासून लांब गेलेलो नाही. आमचे हिंदुत्व विकृत नाही.
 • आमच्यावर संस्कार असल्याने आम्ही असे करत नाही, आमच्यावर हिंदुत्वाचे संस्कार आहेत.
 • आमच्या कुटुंबियांचा आपमान करणार असाल, तर आम्हालाही तुमच्या कुटुंबाचे लागबंधे जाहीर करावे लागतील
 • सरकारविरोधात बोलल्यावर देशद्रेही ठरवतात.
 • भाजपात आज अनेक भ्रष्ट माणसे आली आहेत, त्यांच्यासोबत चांगली माणसे कशी बसू शकतात.
 • बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेला पक्ष असे नाव ठेवा.
 • तुम्ही मोदींच्या नावाने मते मागा, मी माझ्या वडिलांच्या नावाने मते मागतो, बघूया जनता कोणाच्या बाजूने आहे ते.
 • तुमचे 52 काय 152 कुळे खाली उतरली तरी ठाकरेपासून शिवसेना वेगळी करणे शक्य नाही.
 • भाजप मिध्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार का, हे त्यांनी स्पष्ट करावे.
 • आताचे प्रदेशाध्यक्ष म्हणातात आम्ही शिंदे गटाला 48 जागा देणार, निदान तुमच्या नावएवढ्या जागा तरी त्यांना द्या.
 • आम्ही हृदयावर दगड ठेवून हे स्वीकारले आहे, असे तेव्हाचे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले होते.
 • ही आमची शिवसेना आहे, आम्ही शिवसेनाच म्हणणार, ही माझ्या वडिलांनी स्थापन केलेली आहे.
 • त्यांनी मागितलेले प्रतिज्ञापत्र आणि सदस्यपत्रे आपण त्यांना दिलेली आहे.
 • त्यानंतर शिवसेना कोणाची या निर्णय त्यांनी द्यावा,
 • निवडणूक आयोगाचे गांडूळ झाले आहे. त्यांना मोतीबिंदू झाले नसतील, तर खेड आणि मालेगावची सभा बघावी
 • महाराष्ट्राची अवहेलना किती सहन करणार, राज्यातील उद्योगधंदे राज्याबाहेर जात आहेत.
 • महाराष्ट्राचे, मुंबईचे वस्त्रहरण सुरू असून मिधे फक्त बघत आहे. एवढी मिंधे सरकार याआधी कधीही बघितले नव्हते.
 • वस्त्रोद्योग आयुक्तालयही आता त्यांनी दिल्लीला नेले आहे.
 • त्यांनी स्वतःच्या माथ्यावर गद्दार हा शिक्का मारून घेतला आहे, तो कधीही पुसला जाणार नाही.
 • सत्ता गेल्याचे दुःख नाही, मात्र, छत्रपती शिवरायांचा भगवा हातात घेऊन ते नाचत आहे.
 • कधी मदत देणार ते सांगा, हे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना काहीही मिळालेले नाही.
 • केंद्रीय कृषीमंत्री म्हणतात, अवकाळीचा फारसा फटका बसलेला नाही. आम्ही मदत देऊ
 • महिलांचा, शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री पदावर आहेत.
 • दिव्यदृष्टी प्राप्त झालेले कृषीमंत्री रात्रीच्या वेळी नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतावर जातात.
 • मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात रमतात, मात्र बांधावर यायला त्यांना वेळ नाही.
 • एका शेतकऱ्याने रक्ताने लिहिलेल्या पत्राला उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही.
 • माझ्या सभेला उत्तर देण्यासाठी उत्तर सभा घेण्याऐवजी कर्जाखाली दबलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्या
 • शेतकऱ्यांना हमीभाव नव्हे तर हमखास भाव मिळाला पाहिजे, हीच आपली भूमिका होती.
 • शेतकऱ्यांना आर्थिक सबल करण्यासाठी पिकेल ते विकेल ही योजना आपण आणणार होतो.
 • सत्ता आल्यावर आपण सर्वात आधी शेतकऱ्यांना मदत केली.
 • एका कांदा 50 खोक्यांना जात असेल, तर तुम्हाला तुमच्या मोहनतीचा पैसा मिळालाच पाहिजे.
 • अद्वय कठीण परिस्थितीत येथे आले आहेत. एका महाराष्ट्राच्या धाग्याने आम्ही एकत्र आहोत.
 • तुम्ही पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरले पण जनतेच्या मनातील हे प्रेम कधीच चोरू शकणार नाही.
 • जनतेचे हे प्रेम गद्दारांना कधीच मिळणार नाही.
 • ढेकणांना चिरडण्यासाठी तोफेची गरज नाही.
 • आता जिंकेपर्यंत लढायचे आहे, त्यासाठी सोबत या
 • आपण पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी नाही, तर जनतेच्या पश्नासाठी लढण्यासाठी आपण इथे आहोत.
 • आपला पक्ष आणि धनुष्यबाण चोरले आहे. आपल्याकडे काहीही नाही. तरीही अथांग सभा होत आहे.
 • खेडमध्ये अतिविराट, विशाल सभा झाली. इथे ही अथांग सभा होत आहे.
 • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाला सुरुवात
 • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वागत
 • ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, त्या सर्वांना त्यांच्याच खोक्याखाली चिरडायचे आहे
 • सर्व जातीधर्माचे लोक ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत, ते दाखवण्यासाठीच ही सभा आहे.
 • मालेगावातील ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही.
 • शिवसेना काय आहे, ते बघायचे असेल तर निवकडूनक आयोगाने इथे येऊन बघावे.
 • मालेगावात शिवसेनेचे तुफान उसळले आहे, हे तुफान कोणी रोखू शकत नाही
 • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्या संबोधनाला सुरुवात
 • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सभास्थळी आगमन
 • आज महाराष्ट्राला शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गरज आहे.
 • लायकीपेक्षा जास्त मिळालेल्यांना सत्तेची मस्ती आली आहे.
 • कर्मवीर भाऊसाहेबांचा वारसदार म्हणून महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण शिवसेनेसोबत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आलो आहोत.
 • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते अद्वय हिरे यांच्या संबोधनाला सुरुवात
 • ताटाखालचे मांजर सत्तेवर आल्यावर राज्यातील उद्योग राज्याबाहेर पाठवण्यात आले.
 • त्यामुळे निवडणुका घेण्याची हिंमत त्यांच्यात नाही.
 • महाविकास आघाडीला मिळत असलेल्या यशामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
 • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सुभाष देसाई यांच्या संबोधनाला सुरुवात
 • मालेगावात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला सुरुवात