Live दिल्लीत अर्ध सैनिक दलाचे जवान तैनात होणार, गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने लागू केलेल्या तिन्ही कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली. परंतु हे आंदोलन चिघळले असून आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले आहेत.

लाईव्ह अपडेट –

 • प्रजासत्ताकदिनी शेतकरी आंदोलकांनी घातलेल्या गोंधळानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत दिल्लीमध्ये अर्ध सैनिक दलाचे 1500 जवान तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
 • दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी चार एफआयआर दाखल झाल्या आहेत. आंदोलकांवर 8 बस, 17 गाड्या, 4 कंटेनर आणि 300 हून अधिक बॅरिकेट्स तोडल्याचा आरोप आहे.
 • शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 86 पोलीस जखमी झाले. यातील 45 पोलिसांनी ट्रॉमा सेंटरमध्ये, तर 18 पोलिसांनी एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 • दिल्लीतील परिस्थितीबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी आपल्या निवासस्थानी एक तातडीची बैठक बोलावली आहे.

 • दिल्लीतील दृश्य धक्कादायक असून हे अस्वीकारार्ह आहे. दिल्ली खाली करून शेतकऱ्यांनी पुन्हा बॉर्डवर परतावे. – कॅप्टन अमरिंदर सिग, पंजाबचे मुख्यमंत्री

 • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती जाणून घेतली.

 • कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पाहता दिल्ली-एनसीआरच्या काही भागात इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे.

 • आम्ही आंदोलकांना सकाळपासून आखून दिलेल्या रस्त्याने रॅली काढण्याचे आवाहन करत आहोत, मात्र त्यांच्यातील काहींनी पोलीस बॅरिकेट्स तोडत पोलिसांवर हल्ला केला. आम्ही शेतकरी संघटनांना शांततेसाठी आवाहन करत आहोत – शालिनी सिंग, पोलीस अधिकारी

 • दिल्लीतील गोंधळ पाहता दिल्ली मेट्रो ग्रे लाईनवरील सर्व स्थानकांमध्ये डीएमआरसीने प्रवेशबंदी लागू केली

 • आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

 • आंदोलक लाल किल्ल्यामध्ये घुसले, लाल किल्ल्यावर फडकवला झेंडा

 • आंदोलनामध्ये राजकीय कार्यकर्ते घुसले असून ते धुडगूस घालत आहेत – राकेश टिकैत, शेतकरी नेते

 • आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

 • लाल किल्ल्यासमोरील ध्वजस्तंभावर आंदोलकांनी झेंडा फडकवला

 • रॅलीसाठी आखून दिलेला रस्ता सोडून आंदोलक दिल्लीतील लाल किल्ल्यावर दाखल

 • झटापटीदरम्यान पोलीस आणि आंदोलकांना दुखापत

 • आंदोलक शेतकरी आणि पोलीस आमनेसामने, पोलिसांचा लाठीचार्ज

 • आयटीओ भागात डीटीसीची बस पलटी करण्याचा आंदोलकांचा प्रयत्न

 • शेतकऱ्यांचे आंदोलन अचानक चिघळले
 • दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात

आपली प्रतिक्रिया द्या