वानखेडेवर वॉटसनचे ‘तुफान’, चेन्नईने तिसऱ्यांदा जिंकला आयपीएल चषक

98

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या आयपीएल २०१८ च्या फायनल सामन्यात चेन्नईने हैदराबादचा ८ विकेट्सने पराभव करत आयपीएलचा चषक जिंकला आहे. चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला सलामीवीर शेन वॉटसन. वॉटसनने तुफानी शतक ठोकले. वॉटसनने फक्त ५१ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांसह शतक पूर्ण केले. वॉटसनने शेवटपर्यंत नाबाद राहात ५७ चेंडूत ११७ धावांचा पाऊस पाडला. यंदाच्या आयपीएलमधील वॉटसनचे हे दुसरे शतक आहे. सुरेश रैनाने ३२ धावांचे योगदान दिले. डू प्लेसिस १० धावांवर बाद झाला.

धोनीच्या नेतृत्तावखाली चेन्नईने तिसऱ्यांदा आयपीएलचा चषक जिंकण्याची कामगिरी केली आहे. यापूर्वी २०१० आणि २०११ मध्ये चेन्नईने आयपीएल चषक जिंकला होता. चेन्नईने तीन आयपीएल जिंकत मुंबईची बरोबरी केली आहे. मुंबईने २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये आयपीएल चषक जिंकला होता.

त्याआधी चेन्नईने नाणेफेक जिंकून हैदराबादला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने युसूफ पठाण नाबाद ४५, कर्णधार केन विलियम्सन ४७ आणि ब्रेथवेटच्या तुफानी २१ धावांच्या बळावर २० षटकात ६ बाद १७८ धावा केल्या. चेन्नईकडून निगडी, ठाकूर, करण शर्मा, ब्राव्हो आणि जाडेजाने प्रत्येकी एक बळी घेतला.

हैदराबादविरुद्ध चार शतकं

आयपीएल २०१८ मध्ये एकूण पाच शतकं ठोकली गेली. यातील चार शतकं स्पर्धेत सर्वोत्तम गोलंदाजी असणाऱ्या हैदराबाद संघाविरुद्ध ठोकण्यात आली. विशेष म्हणजे हे सर्व खेळाडू शेवटपर्यंत नाबाद राहिले.

दिल्लीकर ऋषभ पंत – नाबाद १२८
चेन्नईच्या विजयाचा हिरो शेन वॉटसन – नाबाद ११७
बंगळुरुचा स्टार ख्रिस गेल – नाबाद १०४
चेन्नईचा सलामीवीर अंबाती रायडू – नाबाद १००

 • सतरा षटकात चेन्नईच्या २ बाद १६६ धावा
 • फायनलमध्ये धावांचा पाठलाग करताना शतक ठोकणारा पहिला खेळाडू
 • वॉटसनचे तुफानी शतक, ५१ चेंडूत १०० धावा पूर्ण

 • सोळा षटकानंतर चेन्नई २ बाद १५४ धावा, वॉटसन शतकाच्या जवळ
 • पंधरा षटकात चेन्नईच्या २ बाद १४६ धावा
 • चेन्नईला विजयासाठी ३४ धावांची आवश्यकता
 • चौदा षटकानंतर चेन्नईच्या २ बाद १४५ धावा
 • अंबाती रायडू मैदानात
 • रैना-वॉटसनमध्ये ११७ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी
 • चेन्नईला दुसरा धक्का, सुरेश रैना ३२ धावांवर बाद

 • १३ षटकानंतर चेन्नई १ बाद १३१ धावा
 • वॉटसनची तुफानी फटकेबाजी, संदीप शर्माच्या एकाच षटकात २७ धावा कुटल्या
 • बारा षटकानंतर चेन्नई १ बाद १०४
 • चेन्नईच्या १०० धावा पूर्ण

 • ११ षटकात चेन्नईच्या १ बाद ९५ धावा
 • वॉटसनने ३३ चेंडूत ठोकले अर्धशतक
 • वॉटसनचे अर्धशतक, २०१८ मधील तिसरे अर्धशतक

 • चेन्नईला ६० चेंडूत ९९ धावांची आवश्यकता
 • दहा षटकानंतर चेन्नई १ बाद ८० धावा
 • नऊ षटकानंतर चेन्नईच्या १ बाद ७२ धावा
 • सिद्धाथ कौलच्या एकाच षटकात १६ धावांची बरसात
 • आठ षटकानंतर चेन्नईच्या १ बाद ५६ धावा
 • सात षटकानंतर चेन्नईच्या १ बाद ५१ धावा
 • चेन्नईला ८४ चेंडूत १४४ धावांची आवश्यकता
 • सहा षटकानंतर चेन्नई १ बाद ३५
 • पाच षटकानंतर चेन्नईच्या १ बाद २० धावा
 • सुरेश रैना मैदानावर
 • चार षटकानंतर चेन्नई एक बाद १४ धावा

 • चेन्नईला पहिला धक्का, डू प्लेसिस १० धावांवर बाद
 • तीन षटकानंतर चेन्नईच्या बिनबाद १० धावा
 • दोन षटकानंतर चेन्नईच्या बिनबाद ५ धावा
 • चेन्नईने चौकाराने खाते उघडले
 • हैदराबादची चांगली सुरुवात, भुवीने टाकली मेडन ओव्हर
 • चेन्नईच्या फलंदाजीला सुरुवात, वॉटसन आणि डू प्लेसिस मैदानात
 • हैदराबादचे चेन्नईसमोर १७९ धावांचे आव्हान

 • युसूफ पठाणची तुफानी खेळी, २५ चेंडूत नाबाद ४५ धावा
 • अखेरच्या चेंडूवर ब्रेथवेट बाद, ११ चेंडूत २१ धावांची खेळी
 • १९ षटकानंतर हैदराबाद ५ बाद १६८ धावा
 • निगडीची शानदार गोलंदाजी, १९ व्या षटकात दिल्या फक्त ८ धावा
 • अठरा षटकानंतर हैदराबाद ५ बाद १६० धावा
 • हैदराबादच्या दीडशे धावा पूर्ण
 • सतरा षटकानंतर ५ बाद १४४
 • हुड्डानंतर ब्रेथवट मैदानात, युसूफला देणार साथ
 • हैदराबादला पाचवा धक्का, दीपक हुड्डा ३ धावांवर बाद
 • १६ षटकानंतर हैदराबाद ४ बाद १३४
 • शाकिब बाद झाल्यानंतर दीपक हुड्डा मैदानात
 • हैदराबादला चौथा धक्का, ब्राव्होच्या गोलंदाजीवर शाकिब अल हसन २३ धावांवर बाद

 • पंधरा षटकानंतर हैदराबादच्या ३ बाद १२६ धावा, ८.४० च्या सरासरीने फटकेबाजी
 • चौदा षटकानंतर हैदराबाद ३ बाद ११७, शाकिब-पठाण मैदानावर
 • तेरा षटकानंतर हैदराबादच्या ३ बाद १०८ धावा
 • युसूफ पठाण मैदानावर

आयपीएलमधील खास क्लबमध्ये विलियम्सनचा समावेश, डिव्हिलिअर्सला धोबीपछाड

 • हैदराबादला तिसरा धक्का, कर्णधार विलियम्सन ४७ धावांवर बाद
 • बारा षटकानंतर हैदराबाद २ बाद १०१ धावा
 • हैदराबादच्या शंभर धावा पूर्ण
 • ११ षटकानंतर हैदराबादच्या २ बाद ९० धावा
 • शाकिबची आक्रमक फलंदाजी, एकाच षटकात १७ धावा वसूल
 • दहा षटकानंतर हैदराबादच्या २ बाद ७३ धावा
 • नऊ षटकानंतर हैदराबाद २ बाद ७० धावा
 • धवननंतर शाकिब अल हसन मैदानात

 • हैदराबादला दुसरा धक्का, शिखर धवन २६ धावांवर बाद
 • धवन-विलियम्सनमध्ये ५० धावांची भागिदारी
 • आठ षटकानंतर हैदराबाद १ बाद ६२ धावा
 • वानखेडेवर धोनी.. धोनी… नावाचा जयघोष

 • सात षटकानंतर हैदराबाच्या १ बाद ५१ धावा
 • सहा षटकानंतर हैदराबादच्या १ बाद ४२ धावा
 • पाच षटकानंतर हैदराबादच्या ६ च्या रनरेटने १ बाद ३० धावा
 • विलियम्सनच्या स्पर्धेत ७०० धावा पूर्ण, चहरला चौकार लगावत गाठला हा आकडा
 • विलियम्सनचा चहरच्या गोलंदाजीवर षटकार
 • चार षटकानंतर हैदराबादच्या १७ धावा
 • निगडीचे सलग सहा डॉट चेंडू, निर्धाव षटकानंतर हैदराबादवर दबाव वाढला
 • तीन षटकानंतर हैदराबाद १ बाद १७
 • चहरची शानदार गोलंदाजी, तिसऱ्या षटकात फक्त तीन धावा
 • दोन षटकानंतर हैदराबाद एक बाद १४ धावा
 • कर्णधार केन विलयम्सन मैदानात

 • हैदराबादला पहिला धक्का; गोस्वामी रनआऊट
 • पहिल्या षटकात हैदराबाद बिनबाद ६ धावा
 • चेन्नईची झाली नो बॉलने सुरुवात
 • चेन्नईने नाणेफेक जिंकून हैदराबादला फलंदाजीसाठी आमंत्रित केले

 

आपली प्रतिक्रिया द्या