Live : आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका! उद्धव ठाकरेंचा विमा कंपन्या, बँकांना इशारा

63

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळालेली नसून शिवसेनेन याविरोधात मोर्चा काढला. या मोर्चानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

 • 15 दिवसांत जर विमा कंपन्या आणि बँकांनी शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर 16 व्या दिवशी हा मोर्चा बोलायला लागेल ही इशारावजा सूचना देतोय.
 • आम्ही जनतेशी आणि मातीशी इमान राखणारे आहोत, त्यांच्यासाठी परिणामांची चिंता न करता तुमच्या पेकाटात लाथ घातल्याशिवाय राहणार नाही
 • बँक आणि विमान कंपन्यांनी कृपा करावी, आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका
 • शेतकऱ्यांच्या योजनेमध्ये येणाऱ्या काळ्या मांजरांसाठी आम्हाला हा मोर्चा काढावा लागला आहे
 • ही पंतप्रधान फसल योजना ही ती आम्ही पंतप्रधान विमा कंपनी बचाव योजना होऊ देणार नाही
 • गावागावात शिवसैनिकांना बँकांना जाऊन सांगा, कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची नावे बँकांच्या दारावर लागलीच पाहिजेत
 • शेतकरी फसवणुकीचा डाग लागू नये म्हणून देहत्याग करतात, आम्ही या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत
 • मल्ल्या मोदीसारखे बँकांना फसवून देश सोडून पळून जातात
 • बँकांनाही सांगतोय की तुमच्या खात्यातून आम्हाला फसवणूक नकोय
 • विमा कंपन्यांनी 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांची जी प्रकरणे लटकवून ठेवली आहेत,त्यांना न्याय द्यावाच लागेल
 • सरकारने जर पैसे दिले असतील आणि शेतकऱ्यांना ते मिळाले नसतील तर मग ते गेले कुठे ?
 • मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की कर्जमाफीसाठी सगळे पैसे बँकांना दिले आहेत
 • विमा कंपन्यांप्रमाणेच बँकांनाही इशारा देतोय
 • जो शेतकरी धनधान्य पिकवतो, देशाच्या रक्षणासाठी आपल्या पोटचा मुलगा देतो त्या शेतकऱ्याची जबाबदारी आपण घेऊ शकत नाही ?
 • शिवसैनिकांच्या हृदयातील भगवी मशाल विझलेली नाही
 • आजवर लाखों शेतकऱ्यांनी न्याय मिळत नाही म्हणून आत्महत्या केल्या आहेत
 • आम्ही माणुसकी मानणारी लोकं आहोत
 • सरकार कोणाचेही असले तरी माणुसकी ही महत्वाची आहे
 • नमकहरामी करणारी औलाद तुमची असल्यास ती तुम्ही जोपासत बसा
 • आम्ही नमकहराम नाही, खाल्लेल्या मिठाला जागणारे आहोत
 • आमच्यावर टीका करणाऱ्यांच्या रक्तात भेसळ झालीय ती त्यांनी तपासून बघावी
 • हा मोर्चावर टीका करणाऱ्यांच्या टीकेची आम्ही पर्वा करत नाही
 • मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्याच्या रक्ताशी आम्ही बांधील आहोत
 • आपल्या मुंबईसाठी ज्यांनी रक्त सांडले त्यामध्ये शेतकरीही आहेत, त्यांचेही बलिदान आहे
 • एक पक्ष असा आहे, ज्यांनी ‘अध्यक्ष हवाय’ अशी पाटी लावलीय, जर त्यांना अध्यक्ष सापडला नाही तर  थोड्य़ा दिवसांनी त्यांना त्यांचा पक्ष शोधावा लागेल
 • शेतकऱ्याला जेव्हा चहूबाजूने संकट ग्रासते तेव्हा तो आत्महत्या करतो.
 • दोन घास ज्याच्यामुळे येतात,तो शेतकरी उन्हापावसाचा विचार न करता राब राब राबत असतो
 • सगळ्या कंपन्यांना लंच टाईम असतो, आपण काम करतो ते पोटासाठी करतो.
 • ही ऑफिसेस बघून ठेवा , कधी ना कधी यांच्यावर धडकण्याची वेळ येणार आहे
 • अनेकांना प्रश्न पडला, की मुंबईमध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन करणार काय?
 • जुलै महिना पावसाचा असतो, मात्र अजूनही पावसाचा पत्ता नाहीये.
 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात
 • शिवसेना झिंदाबाद, आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणांनी सारा परिसर दणाणला
 • उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मोर्चाला सुरुवात
 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात येणार
 • शिवसेना खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, शिवसेना सचिव आदेश बांदेकर मोर्चासाठी उपस्थित
 • खासगी विमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चासाठी हजारों शिवसैनिक रस्त्यावर उतरले
 • शेतकऱ्यांसाठी पीक विमा कंपन्यांच्या विरोधात आज शिवसेनेचा इशारा मोर्चा