आयकराच्या मर्यादेत कोणताही बदल नाही!

3015

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

 

 • शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास १ लाख रुपयाच्या कमाईवर १० टक्के कॅपिटल गेन टॅक्स
 • म्युचुअल फंडवर मिळणाऱ्या परताव्यावर १० टक्के कॅपिटल गेन टॅक्स लावणार
 • शिक्षण अधिभार ३ टक्क्यांवरून ४ वर नेला
 • इपोर्टेट मोबाईल, टीव्ही महागणार
 • शेअर खरेदी विक्री महागणार
 • शेअर बाजार ३३० अंकांनी कोसळला
 • १९४ Aअंतर्गत एक्झम्पशन लिमिट १० वरून १५ हजार केली
 • ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत बँका, पोस्टातील गुंतवणुकीवरील सवलत १० हजारापासून ५० हजार केली
 • आयकराच्या मर्यादेत कोणताही बदल नाही
 • पगारधारी वर्गाला स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ४० हजार केली
 • ७६ हजार कोटींपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर हा पगार कमावणाऱ्या व्यक्ती भरतात
 • सोन्याची गुंतवणूक, खरेदी, तारण सोपे करणार
 • नोटाबंदीमुळे १ हजार कोटींचा टॅक्स जमा झाला
 • आयकरामुळे ९० हजार कोटी मिळाले
 • १०० कोटींची उलाढाल असलेल्यांना कृषी कंपन्यांना ५ वर्षांसाठी १०० टक्के कर सवलत
 • १९.२५ लाख नवे टॅक्सपेअर्स २०१६-२०१७मध्ये बघायला मिळाले
 • २०१६-१७मध्ये १२.६ टक्के थेट करात वाढ झाली आहे
 • सकल उत्पन्नाच्या ३.३टक्के वित्तीय तूट २०१८-२०१९ साठी असेल असा अंदाज
 • १६-१७ मध्ये ३.५ टक्के वित्तीय तूट
 • खासदारांचे मानधन आता महागाईनुसार आढावा घेऊन बदलणार
 • राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांचे मानधन वाढवण्याचा निर्णय ५ लाख राष्ट्रपती ४ लाख उपराष्ट्रपती आणि ३.५ लाख राज्यपालांचे
 • १४ सरकारी कंपन्यांचे शेअर्स आणले जाणार आधार क्रमांकाप्रमाणे प्रत्येक उद्योगाला UID मिळणार
 • निर्गुंतवणुकीतून ८० हजार कोटीं मिळतील असा अंदाज
 • अनेक सरकारी वीमा कंपन्यांचा विलय केला जाईल
 • आरबीआय कायद्यात संशोधन करणार
 • ‘ओएनजीसी’त निर्गुंतवणूक करणार
 • सगळ्या टोल नाक्यांवर फास्ट टॅग प्रणालीचा वापर सुरू केला जाणार
 • ५जी वर चेन्नईमध्ये संशोधनाला सुरुवात होणार
 • क्रिप्टोकरन्सीवर बंदी आल्यानंतर बिटकॉईनचा दर आणखीनच घसरला
 • क्रिप्टो करन्सीच्या वापराला बंदी घालणार
 • आर्टिफिशिअल इंटेलिजन्स साठी राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेतला जाणार
 • पर्यटन क्षेत्रात ‘रोप वे’ ला प्रोत्साहन देणार
 • देशातील रेल्वेच्या ३६०० रुळांच्या नुतनीकरणाचे उद्दिष्ट्य
 • मुंबईतील ९० किलोमीटर रुळांचे विस्तारीकरण
 • मुंबईतील रेल्वेसेवेसाठी ११ हजार कोटींची तरतूद
 • सध्या १२४ एअरपोर्ट आहेत
 • हवाई चप्पल वापरणारेही आता हवाई यात्रा करू लागले आहेत
 • सर्व स्थानकांवर वायफाय सुविधा, एस्कलेटर्स लावण्यात येतील
 • ४० हजार कोटी एलिव्हेडेट कॉरीडॉर आणि अन्य योजनांसाठी देणार
 • ६०० स्थानकांच्या पुनर्निमाणाचं काम सुरू झालं आहे
 • रेल्वे रुळांच्या देखभालीकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे
 • रेल्वेच्या १८ हजार किलोमीटरचं दुपदरीकरणाचं काम सुरू आहे
 • राष्ट्रीय महामार्ग ९ हजार किलोमीटर पेक्षा २०२० पर्यंत पूर्ण होतील
 • सी प्लेनला प्रोत्साहन देणार
 • रेल्वे आणि रोड क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली आहे
 • ७१४८ कोटी टेक्स्टटाईल क्षेत्रासाठी तरतूद
 • नव्या कर्मचाऱ्यांना ईपीएफमध्ये सरकार १२ टक्के देणार
 • नव्या कर्मचाऱ्यांना ईपीएफमध्ये त्यांचा वाटा आता कमी द्यावा लागणार
 • ७० लाख नव्या रोजगारसंधी निर्माण करणार
 • १७ लाख रोजगारांची निर्मिती झाली
 • ३ वर्षात रोजगार निर्मितीसाठी बरेच प्रयत्न झाले
 • मुद्रा योजनेअंतर्गत ३ लाख कोटींची कर्ज देण्याचं उद्दीष्ट
 • क्षयरोगाच्या रुग्णांना दर महिना ५०० रूपयांची मदत मिळणार
 • गंगा स्वच्छतेसाठी १०८० प्रोजेक्ट सुरू आहेत
 • १ मेडिकल कॉलेज ३ लोकसभा मतदार संघासाठी आणि राज्यासाठी किमान एक कॉलेज हे उद्दीष्ट आहे
 • २४ नवी मेडिकल कॉलेज सुरू करणार
 • टीबीमुळे अनेकांचे मृत्यू होतात, याचा फटका गरीब आणि कुपोषितांना बसतो
 • ५ लाख रूपये कुटुंबासाठी वर्षाला वीमा कवच मिळेल, जगातील सर्वात मोठा सरकारने आर्थिक सहाय्य केलेला आरोग्य कार्यक्रम असेल
 • आयुष्यमान भारत योजनेमुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे
 • नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन स्कीम १० कोटी गरीब कुटुंबांसाठी लागू करणार, ५० कोटी नागरिकांना फायदा होतील
 • राष्ट्रीय स्वास्थ बीमा योजना हे ३० हजारचं गरीबांना कवच देतं
 • १२ हजार कोटी या योजनेसाठी देणार
 • १.५ लाख सेंटर या आरोग्य सुविधा घरापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतील
 • आयुष्यमान भारत योजना सुरू करणार
 • प्राईम मिनिस्टर रिसर्च फेलो, बी.टेकच्या विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये पीएचडी साठी सहाय्यता करणार
 • २ नवी प्लॅनिंग आणि आर्कीटेक्ट कॉलेज सुरू करणार
 • २०२२ पर्यंत १ लाख कोटींची शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद
 • स्थानिक कलांची जपणूक करण्यासाठी एकलव्य शाळांची सुरुवात करणार
 • काळ्या फळ्यापासून डिजिटल बोर्डाकडे शाळांचा प्रवास सुरू झाला आहे
 • शिक्षकांचा दर्जा सुधारला की शिक्षणाचाही दर्जा सुधारेल
 • शिक्षणाचा दर्जा ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे
 • महिला बचत गटांसाठी कर्ज ७५ हजार कोटीपर्यंत पोहचेल
 • २०१७-२०१८ ५१ लाख आणि पुढच्या वर्षासाठी ५१ लाख घरांची निर्मिती सुरू आहे महिला बचत गटांसाठी कर्ज ७५ हजार कोटीपर्यंत पोहोचेल
 • गरीबाच्या डोक्यावर छताची चिंता असते , त्यासाठी २०२२ पर्यंत प्रत्येक गरीबाकडे त्याचं घर असेल हे आमचं उद्दिष्ट्य आहे
 • २ कोटी शौचालय बनवण्याचं आमचं उद्दीष्ट्य आहे
 • गरीबांना वीज जोडणीसाठी १६०० कोटींची तरतूद
 • प्रधानमंत्री सौभाग्य योजनेत ४ कोटी गरीब घरांमध्ये वीज देण्यात आली
 • गरीब महिलांना लाकडापासून होणाऱ्या धुरापासून त्रास व्हायचा, उज्ज्वला योजनेत आता लक्ष्य ८ कोटी गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन देणार
 • देशाचं सध्याचं नेतृत्व गरिबीतून वर आलेलं आहे
 • बांबूच्या क्षेत्राला वन क्षेत्रापासून वेगळं केलं जाणार, तसं समजले जाईल
 • मत्स्य आणि पशुउत्पादन विभागासाठी १० हजार कोटींची तरतूद
 • राष्ट्रीय बांबू मिशन सुरू करणार
 • उद्योगाप्रमाणे कृषी क्षेत्रात क्लस्टर योजना सुरू करणार
 • जेटली यांनी बसून अर्थसंकल्प वाचायला सुरुवात केली
 • ऑपरेशन ग्रीन सुरू करणार त्यासाठी ५ हजार कोटी देणार
 • कांदा, टोमॅटो आणि बटाटा या भाज्या सर्वात जास्त ग्रहण केल्या जातात
 • ४७० एपीएमसी या ई-नाम योजनेने जोडल्या गेल्या आहेत
 • निती आयोग एक धोरण आणून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल याची खबरदारी घेईल
 • ३० कोटी टन फळांचं उत्पादन झालं
 • भाज्या आणि फळांचं ऐतिहासिक उत्पादन झालं आहे
 • जेटलींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ, तर सत्ताधाऱ्यांनी दिलं बाकं वाजवून प्रोत्साहन
 • शेतकऱ्यांचं २०२२ पर्यंत उत्पन्न दुप्पट करण्याचं आमचं उद्दीष्ट आहे
 • अनेक सेवा आता नागरिकांना घरपोच मिळतायत किंवा बँक खात्यात त्यांना त्याचे पैसे जमा झालेले बघायला मिळते आहे
 • अनावश्यक नियमांसोबत संघर्ष करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्याचं सरकारने काम केलं आहे
 • पासपोर्ट आता ५ दिवसात मिळायला लागला आहे, त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे
 • गरीब आणि मध्यम वर्गाचं जीवन अधिक सुसह्य कसे होईल यावर भर देणारा अर्थसंकल्प असेल
 • यंदाचा अर्थसंकल्प हा कृषी आमि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर देणारा असेल, आर्थिक दुर्बळ घटक आणि ज्येष्ठांचाही अर्थसंकल्पात विशेष अर्थाने विचार करण्यात आला आहे
 • निर्यात १५ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे
 • उत्पादन क्षेत्र हे वाढीस लागले आहे
 • ७.२ ते ७.५ टक्के जीडीपीचा दर असेल
 • देशाची अर्थव्यवस्था २.५ ट्रिलियन इतकी झाली आहे
 • आम्ही अनेक संकटांचा सामना केला
 • डिजिटल तंत्रज्ञानामुळे गरीबांना मदत लवकरात लवकर पोहचवता येईल
 • एक वेळ होता जेव्हा भ्रष्टाचार शिष्टाचाराचा भाग बनला होता, हे चित्र बदलले आहे
 • सुधारणांमुळे एफडीआयमध्ये गुंतवणूक वाढली
 • आम्ही हिंदुस्थानचे चित्र बदलले
 • अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प वाचण्यास केली सुरुवात
 • यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या गरजा पूर्ण करणारा असेल-सुरेश प्रभू
 • यंदाच्या अर्थसंकल्पाचा बहुतांश भाग हिंदीतून असणार, थोडा भाग हा इंग्रजीतून असेल
 • अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात
 • अलवर आणि अजमेर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार पिछाडीवर
 • अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी भाजपला हादरा
 • सेन्सेक्स १३५ अंकांनी वधारला, निफ्टी ११०७० वर पोहोचला
 • अर्थमंत्री अरूण जेटली संसदेत पोहोचले
 • आयकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा सध्या २.५० लाख आहे. ही मर्यादा ३ लाखांपर्यंत वाढू शकते
 • गेल्या तीन वर्षांत सर्व बचत ठेवींवरील व्याज दरात घट होत आहे. याचा फटका मध्यमवर्गीयांना बसत आहेच; पण बँकांमधील ठेवीही कमी होत आहेत. लोकांचा कल म्युच्यूअल फंड गुंतवणुकीकडे वाढत आहे. यावर बजेटमध्ये
  काय पाऊल उचलले जाते याकडे जनतेचे लक्ष आहे
 • आयकर कायद्याचे कलम ८०-सी अंतर्गत पीपीएफ, टॅक्स सेव्हिंग्ज एफडीची मर्यादा १.५ लाखांवरून २ लाखांपर्यंत वाढवावी अशी मागणी आहे
 • नोटाबंदीच्या चक्रामुळे अनेकांचे रोजगार गेले. प्रतिवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले होते. मात्र, अद्याप आश्वासनाची पूर्ती झालेली नाही
 • आर्थिक सर्वेक्षणात कृषी क्षेत्राचा विकासदर २.१ टक्के इतका राहिल, असा अंदाज आहे. २०१६-१७ मध्ये कृषी विकासदर ४.१ टक्के होता
 • महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांत शेतकऱयांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी अर्थसंकल्पात काही योजना आखणार का? याकडे लक्ष लागले आहे
 • २०१६-१७ मध्ये वित्तीय तूट ३.५ टक्के होती. २०१७-१८ मध्ये ही तूट ३.३ टक्के राहील
 • मोदी सरकार सत्तेवर आले, त्यावेळी २०१४मध्ये देशाचे सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) ७.५ टक्क्यांवर होते. नोटाबंदीपूर्वी २०१५मध्ये जीडीपी ८ टक्क्यांवर गेला होता.
 • ८ नोव्हेंबर २०१६च्या नोटाबंदीवेळी जीडीपी ७.१ टक्के होता. २०१७-१८मध्ये जीडीपी ५.४वरून कसाबसा ६.७ टक्के असण्याची शक्यता आहे
 • सर्वाधिक २८ टक्के जीएसटी लावला तरी इंधनाचे दर कमी होतील. त्यामुळे पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी बजेटमध्ये घोषणा होईल का?
 • रोजच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीने जनता त्रस्त आहे. पेट्रोल ८० रुपयांवर, तर डिझेल ६७ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे
 • २०१८मध्ये आठ राज्यांत होणाऱया विधानसभा निवडणुका आणि २०१९च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला जाईल, असा अंदाज आहे
 • २६ मे २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आले
 • अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली
 • भाजप सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प
 • सकाळी ११ वाजल्यापासून अर्थसंकल्प वाचनास सुरुवात होणार
आपली प्रतिक्रिया द्या