Live : राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच

सामना ऑनलाईन । अयोध्या

 • दुष्काळामध्ये शिवसेनेने पक्ष म्हणून काम केले आहे, त्याच्या अर्धे काम तरी आम्हाला प्रश्न विचारणाऱ्यांनी (विरोधकांनी) केलं आहे का ?
 • इथे मंदीर व्हावं ही लोकांची इच्छा आहे
 • पहिले मंदीर आणि मग संसद हे आम्ही आचरणातून दाखवून दिले आहे, उद्या संसदेचे कामकाज सुरू होत आहे, त्यापूर्वी शिवसेनेचे खासदार प्रभू रामाच्या दर्शनासाठी आले आहेत
 • हिंदूंची एकता कायम राहिली पाहीजे
 • मंदिरासाठी अध्यादेश आणावा, कायदा करून मंदिर बनवावे
 • ही जागा अशी आहे, जिथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते
 • राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच
 • पहिले मंदिर फिर सरकार या घोषणेनंतर राम मंदिराचा मुद्दा पुन्हा तापला
 • उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात
 • रामलल्लाचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे व शिवसेना खासदार निघाले
 • थोड्याच वेळात उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार

ayodhya-press-conf

 • उद्धव ठाकरे यांनी घेतले रामलल्लाचे दर्शन

 • जय श्री राम च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

 • ढोल ताशांच्या गजरात उद्धव ठाकरे यांचे स्वागत
 • उद्धव ठाकरे रामलल्लाच्या दर्शनाला पोहोचले
 • उद्धव ठाकरे पंचशील हॉटेलमधून रवाना
 • अयोध्या (फैजाबाद) येथील जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली

 • प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे 9.30 वाजता निघतील

 • उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्येत

 • उद्धव ठाकरे यांचे हॉटेलमध्ये स्वागत
 • उद्धव ठाकरे पंचशील हॉटेलकडे रवाना

 

 • उद्धव ठाकरे फैजाबादमध्ये पोहोचले
 • थोड्याच वेळात उद्धव ठाकरे फैजाबाद विमानतळावर पोहोचणार
 • शहरातील सर्व प्रमुख मार्ग आणि रस्तोरस्ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य कटआऊटस्, उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची होर्डिंग्ज आणि फलक दिमाखात झळकत आहेत.
 • उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी भगव्या रंगानेच सजली आहे.
 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवसेनेच्या 18 विजयी खासदारांसह पवित्र रामजन्मभूमीतील रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.