केंद्र-राज्यानंतर महापालिकेत हे आल्यास, रँडसारखा छळ होईल: उद्धव ठाकरे

सामना ऑनलाईन । पिंपरी

नोटाबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी आमच्या आयाबहिणींनी बाजूला ठेवलेला पैसा बँकेत भरायला लागला, तो काळापैसा नव्हता कष्टाचा पैसा होता. पण भाजपने तुम्हाला रांगांमध्ये उभे केलं. ते केंद्रात आणि राज्यात आहेत तेव्हा ही स्थिती आणि आता महापालिकेतही आले तर हे रँडसारखे होतील आणि घराघरात घुसून धुमाकूळ घालतील, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. पिपंरी-चिंडवड येथे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपकडून होणाऱ्या आरोपांचा कडक शब्दात समाचार घेतला.

नोटाबंदीमध्ये आम्हाला त्रास झाला कारण आमच्याकडे हृदय आहे. नोटाबंदीमुळे सामान्य जनतेला तासंतास रांगेत उभं राहवं लागलं, १००हून अधिक जणांचा मृत्यू झाला. त्याचं दु:ख आम्हाला झालं, त्रास झाला. पण ज्यांच्याकडे काळापैसा आहेत ते कुठे रांगेत उभे दिसले नाहीत. बँका आणि एटीएम बाहेर लागलेल्या रांगेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये श्रीमंत नव्हते, मग नोटाबंदी कशासाठी?, असा सवाल त्यांनी केला.

दुसरा माझा स्पष्ट आरोप आहे की, ज्या उद्योगपतींनी बँकांमधून कर्ज घेऊन या देशाला लुटलं त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याऐवजी ते पैसे देशातल्या गोरगरीब जनतेच्या खिशातून मोदींनी बँकेत टाकले, असा शब्दात मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा बुरखा फाडला.

भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा द्यावाच लागेल, पण देशातील लोकांना त्रास देणे चुकीचं आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

मला लोक विचारतात की तुम्ही केंद्रात आणि राज्यात सोबत आहात मग तरी विरोधी पक्षासारखी भूमिका का घेता? मी त्यांना एक उदाहरण देतो. मी हत्तीच्या डोक्यावर बसलो आहे, पाठीवर जनता बसली आहे. जर हत्ती उन्मत्त झाला तर माझ्या जनतेला त्रास होईल. म्हणून हत्तीला वेळोवेळी अंकूश टोचावाच लागेल आणि तेच मी करतो. हा हत्ती नाही तर दुसरा घेता येईल, जनतेचे हाल होऊ देणार नाही. म्हणून  या हत्तीच्या डोक्यावर बसलो आहोत, अस स्पष्ट आणि सणसणीत उत्तर त्यांनी यावेळी दिलं.

मोदी-पवार एकाच कार्डाच्या दोन बाजू

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्यावेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणं काढून बघा. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कोणत्या शब्दात टीका केली आहे. आता मात्र ते शरद पवार यांच्या घरी जातात, मी त्यांचं बोट धरून राजकारणात आलो आहे, असं म्हणतात. मोदी आणि पवार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अरे नाणं नाही म्हणता येणार कारण त्यांनी कॅशलेस केलं ना सगळं. एका कार्डाच्या दोन बाजू म्हणावं लागेल. (जोरदार हशा) या सगळ्याला काय म्हणावं. आपला देश कुठे चालला आहे ते पाहा. ज्या अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन केले त्यांना पद्मभूषण आणि शरद पवार ज्यांच्या पक्षावर तुम्हीच भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना पद्मविभूषण, असा सणसणीत टोला लगावला.

शिवसेनाप्रमुख नसते तर मोदींचं काय झालं असतं?

हे आता विरोधकांना धमकावता आहेत की, माझ्याकडे सगळ्यांच्या कुंडल्या आहेत. पण शिवसेनाप्रमुख तुमच्या पाठीशी नसते तर मोदी तुम्ही आणि तुमची कुंडली कुठे सडली असती कळलं नसतं, असं उद्धव ठाकरे यांनी सुनावलं.

ज्यांच्यावर टीका करत होतो ते आता भाजपमध्ये

मला काही लोक म्हणतात तुम्ही आधी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करायचे आता तुम्ही भाजपवर टीका करतात. पण मी त्यांना म्हटलं की, ज्या लोकांवर टीका करत होतो ते सगळे आता भाजपमध्ये आहेत. मग करणार तरी काय?, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

 

तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

—————————–

नवीन मंत्रालय काढा आणि त्याचं नाव ठेवा गुंडालय, हे खातं देखील बहुधा मुख्यमंत्री स्वत:कडेच ठेवतील

—————————–

बुलेट ट्रेनची योजना ही मोदींची नाही तर ती काँग्रेसची होती हे स्वत: रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी सांगितलं

—————————–

शिवसेनाप्रमुख जर पहाडासारखे तुमच्या पाठीशी उभे राहीले नसते तर तुम्ही आणि तुमची कुंडली कुठे गेली असती हे कुणाला कळालंही नसतं

—————————–

जो गुंड माताभगिनींवर हात टाकेल त्याचे हात तोडल्याशिवाय आमचे शिवसैनिक शांत बसणार नाही

—————————–

गुंडांना घेऊन तुम्ही भयमुक्त सरकार चालवणार ?

—————————–

ज्या भाजपाला नितीमत्ता होती त्या भाजपाशी आमची युती होती,त्यावेळेला साधूसंत महंत भाजपाच्या व्यासपीठावर असायचे

—————————–

मुंडेंनी शब्द दिला होता की आम्ही महाराष्ट्राला टोलमुक्त करू, तो शब्द तुम्ही का पूर्ण करत नाही

—————————–

गोपीनाथ मुंडे हा  शब्द फिरवणारा नेता नव्हता

—————————–

जर देवेंद्र फडणवीस राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत असतील तर मी त्यांना कायमचा पाठिंबा दिला हे जाहीर करतो

—————————–

महाराष्ट्रात तुमचं सरकार असताना तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज तत्काळ का माफ करत नाही? आम्ही आहोत ना सोबत

—————————–

उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने थाप मारली आहे की सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू

—————————–

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाला माहिती आहे की त्यांचे सरकार येऊच शकत नाही

—————————–

सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय घेत असाल तर, ज्या जवानाने त्यांच्या दूरवस्थेबाबत तक्रार केली होती त्या जवानाची भाजी आणि चपाती तुम्ही खाऊन बघआ

—————————–

मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला नव्हता, जवानांनी केला होता

—————————–

मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, त्या २७ गावांना दिलेली आश्वासनं पूर्ण करा आणि नंतर पिंपरीकरांना फसवायला या

—————————–

तिथल्या २७ गावांची वेगळी महापालिका करण्याचं आश्वासन दिलं होतं, या गावातील लोकांनी भाजपाला मतदान केलं आणि आज बोंबलत बसलेत

—————————–

मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार कोटी कल्याण-डोंबिवलीला देईन असं सांगितलं होतं, आजपर्यंत एकही पैसा दिलेला नाही

—————————–

तुम्ही मला ताकद दिलीत तर मी तुम्हाला ताकद परत देईन

—————————–

साहित्य संमेलन झालं ,तिथे मुख्यमंत्र्यांचं स्वागत काळे झेंडे दाखवून केलं

—————————–

माझा स्पष्ट आरोप आहे की मोठमोठ्या उद्योगपतींनी ज्यांनी बँका बुडवल्या त्यांचं कर्ज मोदींनी तुमच्या खिशातून भरलं

—————————–

नोटाबंदीमुळे पूर्ण जग आपल्यावर हसत असेल

—————————–

जरा रँड प्लेगच्या तपासणीच्या नावाखाली घरात घुसत होता तसे हे घरात घुसण्याचा प्रयत्न करतील

—————————–

हा देश चोरांचा आहे असं समजून या माणसाने संपूर्ण देशाला कामाला लावलं

—————————–

३१ डिसेंबरला लोकांनी घाबरून टीव्ही बंद करून बसले होते

—————————–

भाईयो आणि मित्रों म्हटलं की माणसं घाबरून पळून जातात

—————————–

गोव्यात विधानसभा निवडणूक असेल तरी मोदींचाच फोटो

—————————–

महापालिका निवडणूक असेल तरी मोदींचा फोटो

—————————–

शहरभर फोटो कोणाचे लागले आहेत ?

—————————–

मोहन भागवत म्हणाले की कोणाचीही देशभक्त मोजता येणार नाही

—————————–

पाकिस्तानचा हेर तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो आणि तुम्ही आमच्या अंगावर येता ?

—————————–

मला गुंडपुंड नको, माझे सैनिक समर्थ आहेत

—————————–

हे दोघे एका कार्डाच्या दोन्ही बाजू आहेत (कारण सध्या सगळं कॅशलेस आहे)

—————————–

मोदी म्हणतात पवार माझे गुरू आहेत

—————————–

पवार साहेबांची भाकीतं ज्यांना माहिती आहेत त्यांनी त्यांना पद्मविभूषण दिलंय

—————————–

ज्यांच्याबरोबर लढलो तीच माणसे आता भाजपात गेल्यानंतर टीका करायची कोणावर?

—————————–

मी मुंबईत अडकून पडलेलो नाही

आपली प्रतिक्रिया द्या