बंदुकीच्या धाकावर कर्जवसुली, एजंटला अटक

679
फोटो प्रातिनिधिक

अंधेरीत एका एजंटने कर्जवसुलीसाठी व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला. या प्रकरणी एजंटला अटक करण्यात आली आहे.

राणा भाटिया यांनी व्यावसायिक कारणासाठी एका बँकेतून तीन लाखांचे कर्ज घेतले होते. त्यानुसार त्यांनी दर महिन्याला साडे दहा हजार रुपयांचा हफ्ता भरला. असे त्यांनी एकूण दोन लाख चाळीच हजा रुपये भरले होते. नंतर काही कारणास्तव त्यांनी आपल्या कर्जाचे हफ्ते भरले नव्हते

तेव्हा बँकेचा कर्जवसुली करणा अधिकारी मृत्यूंजय सिंह त्यांना भेटायला आला. तेव्हा भाटिया यांनी सध्या आपण कर्ज फेडण्यास सध्या आपण असमर्थ असल्याचे सांगितले. तेव्हा मृत्यूंजय सिंह चांगलाच भडकला आणि त्याने भाटियावर बंदू रोखली आणि लवकरात लवकर कर्ज फेडण्यास सांगितले. नंतर भाटिया यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आणि मृत्यूंजयविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडील पिस्तूल जप्त केले आहे. 

आपली प्रतिक्रिया द्या