
सणासुदीच्या दिवसात महागाईचे चटके सोसणाऱया सर्वसामान्य जनतेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणखी झटका दिला आहे. रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ केल्यामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज, पर्सनल लोन महागणार आहे. दरम्यान, महागाईचा आणखी भडका उडणार आहे.
विकास दर घटला; 7 टक्क्यांचा अंदाज
- रिझर्व्ह बँकेने 2022-23 मध्ये देशाच्या आर्थिक विकास दरातही 0.2 टक्क्याने घट होईल, असा अंदाज वर्तविला आहे.
- यापूर्वी एप्रिलमध्ये विकास दर 7.2 टक्के राहील असा अंदाज वर्तविला होता. आता 7 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
महागाईचा भडका कायम राहणार
महागाईचा भडका यापुढेही कायम राहणार असून, जानेवारी 2023 पासून नियंत्रणात येईल, असे रिझर्व्ह बँकेने पतधोरणात म्हटले आहे. मात्र, 2022-23 या आर्थिक वर्षात महागाईचा दर 6.7 टक्के राहणार आहे.