एलओसीवर गेल्या 6 महिन्यात पाकिस्तानच्या गोळीबारात 10 जवानांना वीरमरण

जम्मू-कश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान सातत्याने शस्रसंधीचे उल्लंघन करत आहे. पाकिस्तान लष्करी चौक्या, जवान आणि नागरी भागाला लक्ष्य करून गोळीबार आणि तोफगोळे डागत आहे. गेल्या 6 महिन्यात पाकिस्तानने एलओसीवर केलेल्या गोळीबारात 10 जवानांना वीरमरण आले आहे, अशी माहिती केंद्र सरकारने राज्य सभेत दिली.

पावसाळी अधिवेशन सुरू असून यादरम्यान विचारलेल्या एका प्रश्नाला केंद्रीय गृह राज्यमंत्री श्रीपाद नाईक (Minister of State for Defence) यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिले आहे. लाईन ऑफ कंट्रोल (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात गेल्या 6 महिन्यात 10 जवानांना वीरमरण आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, पूर्व लडाखमध्ये हिंदुस्थान-चीन आमनेसामने आल्यापासून पाकिस्तानही सातत्याने शस्रसंधीचे उल्लंघन करत आहे. जम्मू-कश्मीरमधील पुंछ, राजोरी सेक्टरमध्ये पाकिस्तान लष्करी चौक्या आणि नागरी भागाला लक्ष्य करत आहे. हिंदुस्थानचे जवानही याला चोख प्रत्युत्तर देत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या