खारकोपर स्थानकाजवळ लोकलचे डबे घसरले, ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प

नेरुळ येथून बेलापूरमार्गे खरकोपर येथे जाणाऱ्या ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. खारकोपर स्थानकाजवळ लोकलचे तीन डबे घसरून अपघात झाला आहे. रेल्वेचा वेग अत्यंत कमी असल्यामुळे सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर नेरुळ ते खारकोपर (उरण) दरम्यान रेल्वेसेवा चालवण्यात येते. सकाळी साडे आठ वाजता नेरुळहुन खारकोपरच्या दिशेने लोकल जात होती यावेळी खारकोपर स्थानकाजवळ काही अंतरावरच या लोकलचे सुरुवातीचे तीन डबे रुळांवरून घसरले. दरम्यान रेल्वेच्या वतीने डबे पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरु आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)