थेंबभर पावसाने मध्य रेल्वेची सेवा बोंबलली

16

सामना ऑनलाईन, ठाणे
कानठळ्या बसवणारा विजांचा गडगडाट आणि सोबत आलेल्या पावसाच्या हलक्या सरींमुळे मध्य रेल्वेची सेवा रात्री साडे दहाच्या सुमारास पूर्णपणे विस्कळीत झाली होती. ठाणे स्टेशनमध्ये मुंबईहून ठाण्याकडे येणाऱ्या आणि ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्या स्टेशनमध्येच खोळंबलेल्या होत्या.

वीजपुरवठा करणाऱ्या तारांजवळ ठिणग्या उडत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं ज्यामुळे सगळ्या गाड्यांचे पेंटाग्राफ खाली करण्यात आले होते. यामुळे रात्री उशिरा डाऊन तसंच उप दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. बाहेर थेंब थेब पाऊस पडत असूनही गाड्यांमध्ये कमालीचा उकाडा जाणवत होता त्यातच प्रवासादरम्यान पंखे आणि दिवे लपाछपी खेळल्याप्रमाणे अधूनमधून सुरू होत होते असंही काही प्रवाशांनी सांगितलं. पंखे बंद झाल्यानंतर प्रवाशांची गाडीमध्ये प्रचंड घुसमट होत होती. थेंबभर पावसात मरतुकड्या मरेची ही अवस्था असेल तर पावसाळ्यात काय होईल याची चर्चा खोळंबलेल्या गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांमध्ये सुरू होती.

आपली प्रतिक्रिया द्या