अदृश्य गोंधळामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

29

सामना ऑनलाईन, मुंबई

१ नोव्हेंबरपासून मध्य रेल्वेवर गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय झाला, मात्र तरीही प्रवाशांचा त्रास कमी झालेला नाही. गाड्या उशिराने धावत असल्याने सकाळी कामाचं ठिकाण गाठण्यासाठी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अंबरनाथ ते कल्याण हे अंतर फास्ट कापण्यासाठी ऐरवी १५ मिनिटे लागतात मात्र आज याच प्रवासासाठी ३० मिनिटे लागली. याचं कारण कोणालाही कळत नव्हतं, यामुळे प्रवाशांनी या गोंधळाला अदृश्य गोंधळ असं नाव ठेवलं आहे.

मध्य रेल्वेच्या स्थानकांवर गाड्या उशिराने धावत असल्यास त्याबद्दलची माहिती दिली जात नाही. एका लोकलला उशीर झाला की त्यामागच्या सगळ्या लोकल गाड्या रखडतात. प्रत्येकाला घाई असल्याने कोंबून कोंबून प्रवासी मिळेल त्या गाडीत चढायचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे गाड्यांमधली गर्दी वाढत जाते. पियूष गोयल हे रेल्वेमंत्री झाल्यानंतरही परिस्थिती सुधारलेली दिसत नाही, उलट त्यांनी या खात्याचा भार स्वीकारल्यानंतर परिस्थिती अधिक बिकट झाल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या