कर्नाटकमध्ये भाजप कार्यकर्त्यांची पत्रकाराला मारहाण

53

सामना ऑनलाईन । बंगळुरू

कर्नाटकमधील तुकमूर जिल्ह्यात एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला भाजपच्या दोन कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. हे कार्यकर्ते भाजपचे कर्नाटकचे अध्यक्ष बी. एस. येडीयुरप्पा व तुकमूर जिल्ह्याचे अध्यक्ष जी.बी ज्योती गणेशन यांचे समर्थक आहेत. याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या त्या दोन कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विग्नेश असे त्या पत्रकाराचे नाव असून तो तुकमूर जिल्ह्यातील एका स्थानिक वृत्तवाहिनीचा पत्रकार आहे. त्याने काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील अवैध खाणींमधील भ्रष्टाचाराबाबत भाजप विरोधी बातमी देत त्यात जी.बी ज्योती गणेशन यांच्यावर आरोप केले होते. याच विषयावर ज्यातोगणेशन यांची मुलाखत घ्यायाला विग्नेश एका हॉटेलवर आला होता. मुलाखत झाल्यानंतर विग्नेश परत जात असताना नगरसेवक बी.एस नागेश आणि रविशंकर यांनी विग्नेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी विग्नेशला शिवीगाळ करत त्याचे कपडेही फाडले. त्यावेळी तेथे उपस्थित काही भाजप कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून विग्नेशला त्या दोघांच्या तावडीतून सोडवले. पण त्यादरम्यान विग्नेशला बेदम मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी विग्नेशने भाजपच्या दोन कार्यकर्त्यांविरोधात तक्रार नोंदविली आहे.

दरम्यान विग्नेशला मारहाण केल्याप्रकरणी काही स्थानिक पत्रकारांनी कलबुर्गीतील जिल्हा आयुक्ताच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत भाजप कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. यावेळी पत्रकारांनी भाजप विरोधात घोषणा केल्या

आपली प्रतिक्रिया द्या