एसटीच्या धडकेत लहानग्याचा मृत्यू; संतापलेल्या लोकांनी पेटवल्या बस

48

सामना ऑनलाईन । अमरावती

अमरावतीमधील वरुड शहरात सोमवारी १२ वर्षाच्या मुलाचा एसटीच्या धडकेत मृत्यू झाला. शेख ताविज शेख फिरोज असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेनंतर संतापलेल्या लोकांनी दोन एसटी बसची तोडफोड केली आणि त्यानंतर बस पेटवून दिल्या. पोलीस घटनास्थळी दाखल होण्याआधी बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून बसची आग विझवली.

चिघळलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही जमावाने दगडफेक केली. त्यामुळे परिसरात काही वेळ तणावाची परिस्थिती होती. मात्र बसचे आगीत मात्र मोठे नुकसान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या