लॉकडाऊन 5 ची तयारी? अमित शहा यांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

1670

लॉकडाऊन 4 संपायला अवघे दोन दिवस उरले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवणार की नाही अशी चर्चा सध्या देशभरात रंगली आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर चर्चा केली आहे. त्यावेळी त्यांनी देशातील लॉकडाऊन वाढवण्यावर मुख्यमंत्र्यांचे विचार जाणून घेतले.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर 25 मार्चला देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला. आतापर्यंत चार वेळा टप्प्या टप्प्याने हा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. सध्या देशात 1लाख 65 हजार कोरोनाग्रस्त असून दिवसेंदविस हा आकडा वाढत चालला आहे. असे असताना लॉकडाऊनचे काही नियम शिथील करत लॉकडाऊन वाढवला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की, ‘गृहमंत्र्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा केली आहे. त्यावर त्यांनी राज्यात कोणते उद्योगधंदे सुरू करता येतील याबाबतही चर्चा केली आहे’, असे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या