येडीयुरप्पा सरकारचा संवेदनशून्य कारभार; नवी मुंबईतून नऊ बस भरून गेलेल्या कानडी मजुरांना कर्नाटकने हाकलले

5481

कामानिमित्ताने नवी मुंबईत आलेल्या कर्नाटक मधील दोनशे मजुरांना महाराष्ट्र सरकारने नऊ बस मधून कर्नाटक मध्ये पाठवले, मात्र या मजुरांना कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये आडवून त्यांना एसटी बसमधून खाली उतरूच दिले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव या सर्व मजुरांना पुन्हा नवी मुंबईत यावे लागले आहे. कर्नाटक सरकारच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे मजुरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

लॉकडाऊनमुळे नवी मुंबईत अडकून पडलेल्या कर्नाटक राज्यातील मजुरांनी आपल्या मूळ गावी जाण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली. त्यानुसार मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळाने नऊ बसेस दिल्या. सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्यासाठी एका बसमध्ये फक्त बावीस मजुरांना बसविण्यात आले. मजुरांना घेऊन या बसेस कर्नाटक राज्यात गेल्या असता त्यांना बेळगाव येथे अडवण्यात आले. यापैकी बहुतेक मजुरांना बिदर येथे जायचे होते. मात्र कर्नाटक सरकारने या मजुरांना बेळगाव मध्ये एसटी बसेस मधून खाली उतरू दिले नाही. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला. मजुरांच्या जेवणाची व्यवस्था तिथे करण्यात आली नाही. त्यांना साधे पाणीही विचारले नाही. त्यामुळे त्यांचे अतोनात हाल झाले. मजुरांना कर्नाटक मध्ये घेऊन गेलेल्या एसटी बसेस पुन्हा त्यांना घेऊन नवी मुंबई येथे घेऊन आल्या. कोरोना महामारीतून वाचण्यासाठी आपल्या मूळ गावाकडे निघालेल्या मजुरांना कर्नाटक सरकारच्या गलथान कारभारामुळे विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला.

कर्नाटक सरकारची ही परवानगी

मजुरांना कर्नाटक मध्ये पाठवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी पोलिसांनी ई पास तयार केले होते. हे पासेस तयार करण्यासाठी कर्नाटक सरकारची परवानगी घेण्यात आली होती. परवानगी दिल्यानंतरही कर्नाटक सरकारने मजूरांना घेण्यास नकार दिल्याने शासकीय यंत्रणेचा एकच गोंधळ उडाला.

आपली प्रतिक्रिया द्या