बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षयकुमार निवडणुकीच्या रिंगणात? भाजपकडून उमेदवारीची शक्यता

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

lok sabha election 2019 बॉलीवूडमध्ये ‘खिलाडी’ म्हणून ओळखला जाणारा अक्षयकुमार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भाजपकडून त्याला पंजाबमधील गुरुदासपूर येथून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. अक्षयकुमारच्या एका ट्वीट नंतर या चर्चेला उधाण आले आहे. ‘अत्यंत्य नवखी आणि कधीही स्पर्श न केलेल्या अशी सीमा आज ओलांडत आहे. आज असं काही करायला जात आहे, जे या पूर्वी मी कधीही केले नव्हते. उत्सुकता आणि थोडी निराशा दोन्ही भावना मनात आहेत. पुढील अपडेटसाठी सोबत रहा’, असे अक्षयने आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

या ट्वीटमध्ये कुठेही थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा उल्लेख नाही. मात्र तसे असलेतरी सूत्रांकडून त्याला भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. संध्याकाळपर्यंत यासंदर्भात बातमी येईल असे बोलले जात आहे.