सुजय विखेंविरुद्धच्या सोशल अपप्रचाराविरोधात तक्रार, कारवाईची मागणी

22
sujay-vikhe patil

सामना प्रतिनिधी । नगर

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असलेले डॉ. सुजय विखे पाटील यांच्याबद्दल मतदारांच्या मनात कलुशित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर मजकूर टाकणाऱ्या नानासाहेब शंकर लोखंडे यांच्यावर भादंवि 1860 चे कलम (जी) च्या तरतुदीचा भंग केल्याच्या कारणावरून कायदेशिर कारवाई व्हावी अशा आशयाची तक्रार निवडणूक निर्णय आधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

नानासाहेब लोखंडे यांनी 9 एप्रिल 2019 रोजी सोशल मीडियात मजकूर प्रसिद्ध केला. या मजकुरातून मतदार आणि समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याकडे निवडणूक आधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचारावर व निवडणूक निकालावर विपरीत परिणाम होण्याच्या उद्देशाने निवडणूक काळात केल्या गेलेल्या आरोपांच्या विरोधात कायदेशिर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान श्री. भास्कर महांडुळे या व्यक्तीने देखील ‘लाज कशी वाटत नाही?’ अशा आशयाची पोस्ट प्रसिद्ध केली आहे. सुजय विखे-पाटील यांची प्रतीमा मलीन करण्याच्या व चारित्र्य हनन करण्याच्या हेतून ही पोस्ट लिहिली गेली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशी पोस्ट हा आदर्श आचार संहितेचा भंग करणारा असल्याने त्यांच्या विरोधात कायदेशिर कारवाई करण्याची मागणी उमेदवाराचे प्रतिनिधी डॉ. अभिजीत दिवटे यांनी केला आहे.

अशा बोगस पोस्टद्वारे या व्यक्तिंनी आचारसंहितेमधील तरतुदींचा केलेला भंग लक्षात घेऊन संबधितांना योग्य शासन व्हावे, अशी तक्रार नितीन भगवंतराव विखे यांनी निवडणूक आधिकाऱ्यांकडे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या