नवनिर्वाचित खासदारांचे ‘मातोश्री’वर औक्षण

राजेश देशमाने । बुलढाणा

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलेल्या खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांनी नवनिर्वाचित खासदारांचे औक्षण करून अभिनंदन केले.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवलेल्या खामगाव- बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव, रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने तसेच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे सौ. रश्मी ठाकरे यांनी औक्षण करून अभिनंदन केले. यावेळी आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, बुलढाणा जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, शांताराम दाणे, शिवसेना पदाधिकारी भास्करराव मोरे, नरेंद्र खेडेकर, दत्ता पाटील व बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.