बीड जिल्ह्यात उत्साहाला उधाण; मतदारांच्या रांगाच रांगा

उदय जोशी । बीड

lok sabha election 2019 बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण पाहायला मिळत आहे. मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागल्या आहेत. जिल्ह्याभरात मतदान सुरळीत सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.

बीड जिल्ह्यात अटी-तटीच्या या लढतीमध्ये भाजप खासदार प्रीतम मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्यात सरळ लढत होत आहे. सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून शहरासह ग्रामीण भागात मतदानासाठी मतदारांच्या अक्षरशः रांगा लागल्या. प्रचंड उत्साहाच्या वातावरणात आणि शांततेत मतदान सुरू आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रचंड मोठ्याप्रमाणावर पोलीस तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. उन्हामुळे सकाळच्या वेळात मतदान उरकण्यासाठी घाई दिसून येत आहे.

दरम्यान, राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नाथरा येथे मतदान केले. जयदत्त क्षीरसागर यांनी राजुरी येथे आपला अधिकार बजावला.