नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता देशभराप्रमाणे खुद्द त्यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातही घसरली आहे. मोदींचा तिसऱ्यांदा वाराणसीत विजय झाला असला तरी मताधिक्य प्रचंड घसरले आहे. मतमोजणीच्या पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये तर मोदी हे पिछाडीवर होते. अखेर अवघ्या दीड लाख मतांनी मोदी विजयी झाले. मोदींना 6,12,970 तर काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांना 4,60,457 मते मिळाली. 2014 ला पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवताना मोदींनी वाराणसी मतदारसंघाची निवड केली होती. त्या वेळी अरविंद केजरीवाल त्यांच्याविरुद्ध रिंगणात होते. तीन लाख मतांनी मोदींनी विजय मिळविला होता.