शाहू महाराज विजयी

कोल्हापूरमधून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे 1 लाख 53 हजार 309 मताधिक्याने निवडून आले. प्रतिस्पर्धी मिंधे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्याकडून दत्तक प्रकरणाचा जुना वाद नाहक उकरून, बदनामीचा प्रयत्न करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात तळ ठोकून, मंडलिक यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला.पण स्वाभिमानी कोल्हापूरकरांनी याला सपशेल झिडकारून आपले मत आणि मानही शिवशाहूंच्या गादीला दिला.